Actress

आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच झी मराठी वरील प्रेक्षकांच्या आवडत्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या यशाचं गमक आहे. नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आहे. रसिका सुनीलच्या जागी आता अभिनेत्री ईशा केसकर ही शनाया म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

खऱ्या आयुष्यात ईशाला देखील शनायासारखीच शॉपिंगची आवड आहे. ईशाचा स्टाईल सेन्स देखील शनायासारखाच एकदम हटके आहे. याचा अंदाज नुकत्याच संपन्न झालेल्या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ नामांकन सोहळ्यात सगळ्यांना आला. या सोहळ्याची थीम निऑन आणि पॉप अशी होती आणि ईशा त्या थिमला अगदी अनुसरून तयार होऊन आली. इतकंच नव्हे तर तिची स्टाईल सगळ्या कलाकारांपेक्षा वेगळी असल्यामुळे ईशाने संपूर्ण सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ईशाने या सोहळ्यात एक निऑन फ्लोरोसंट कलरचा आऊटफिट परिधान केला असून त्यावर तिने एक गुलाबी रंगाचा बोआ आणि गुलाबी रंगांचा विग देखील घातला होता. ईशाची ही हटके स्टाईल सगळ्यांना आवडली आणि ईशाने तितक्याच कॉन्फिडन्टली तिचा लुक कॅरी केला. ईशाला या झी मराठी अवॉर्ड्स २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोकृष्ट खलनायिका आणि सर्वोकृष्ट विनोदी व्यक्तिरेखा या विभागात नामांकनं आहेत.

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 13

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 14

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 15

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 16

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Advertisement