Actress

अभिनेत्री सई ताम्हणकरने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावरून ती डिजीटल डिटॉक्सवर जात असल्याचे जाहिर केले. एक महिना डिजीटल डिटॉक्सवर गेलेल्या सईने ह्या दरम्यान पाँडेचरीला जाऊन सचिन कुंडलकरांच्या आगामी सिनेमाचे चित्रीकरण केले. नुकतीच सई पाँडेचरीवरून मुंबईत परत आली आणि सोशल मीडियवरही परतली. सोशल मीडियवर परतताच सईने एक छान ‘क्लासी बॉस बेब’ फोटोशूट केले.

सई ताम्हणकर परतल्यावर सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधताना म्हणाली, “हो, मी आता पाँडेचरीवरून आणि सोशल मीडिया डिटॉक्सवरूनही एका महिन्यांनी मुंबईत परतलेय. माझ्या सोशल मीडिया डिटॉक्सचा मला शुटिंगला खूप फायदा झाला. पण सोशल मीडियामूळे चाहत्यांशी रोजच्या रोज संपर्कात असण्याची सवय असल्याने मी चाहत्यांना खूप मिस केले. ह्या एका महिन्यात खूप काही घडलंय. मी पाँडेचरीत काय-काय केले ते लवकरच मी चाहत्यांसोबत सोशल मीडियावरूनही शेअर करेनच.”

सईच्या ह्या सोशल मीडिया पोस्टलाही तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. ह्या पोस्टनंतर सईचे लागोलाग आलेले बॉस बेब लुकमधले फोटो तर तिच्या चाहत्यांसाठी व्हिजुअल ट्रिट होती असंच म्हणायला हवं. फोटोशूटविषयी सई ताम्हणकर म्हणते, “फोटोशूट करणं, किंवा शुटिंग करणं हा माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे. आता डिजीटल डिटॉक्सनंतर मी पून्हा नव्या जोमाने परतलीय. परतताना, लक्षात येतंय, की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग असला, आणि ते आमच्या सारख्या अभिनेत्यांसाठी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट करायचं एक वरदान असलं. तरीही कधीतरी ह्यातून ब्रेक घेऊन आयुष्यातले नव्या अनुभवांना सामोरे जाणे गरजेचे आहे.”

Sai Tamhankar Classi Photoshoot 01

Sai Tamhankar Classi Photoshoot 02

Sai Tamhankar Classi Photoshoot 03

Sai Tamhankar Classi Photoshoot 04

Sai Tamhankar Classi Photoshoot 05

Sai Tamhankar Classi Photoshoot 06

Sai Tamhankar Classi Photoshoot 07

Sai Tamhankar Classi Photoshoot 08

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)