Events

जॉन अब्राहम यांच्या पहिल्या निर्मिती पदार्पणामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ हा मराठी सिनेमा चर्चेचा विषय झाला होता. नुकताच या चित्रपटाचा शानदार प्रीमियर अभिनेता जॉन अब्राहम व कलाकारांच्या उपस्थितीत संपन्न झाला. एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते जॉन अब्राहम यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सर्व कलाकारांच्या सहकार्यामुळे चांगला चित्रपट करता आल्याची भावना व्यक्त करतानाच दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे–जोशी यांनी कलाकारांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. या प्रीमियरला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एका सुंदर कलाकृतीचा अनुभव घेता आला असं सांगत उपस्थित मान्यवरांनी या सिनेमाचे कौतुक केले आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकावर बेतलेल्या या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. रीमा लागू यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या नाटकाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. हा चित्रपटसुद्धा प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

Premiere Night Photos

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 02

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 03

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 04

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 05

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 06

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 07

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 08

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 09

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 10

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 11

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 12

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 13

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 14

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 15

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 16

Savita Damodar Paranjpe Premiere Photo 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement