Events

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. या मुख्य सोहळ्याइतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो नामांकनाचा सोहळा. एका विशिष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळ्याची यावर्षी ‘निऑन अँड पॉप’ अशी थिम होती.

झी मराठी अवॉर्ड्स २०१८ ची नॉमिनेशन पार्टी गुरुवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी निऑन आणि पॉप या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चला हवा येऊ द्या मधील सगळ्यांचे लाडके विनोदवीर सागर कारंडे आणि श्रेया बुगडे यांनी केले. यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको, जागो मोहन प्यारे, लागिरं झालं जी, बाजी, तुला पाहते रे या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.

या नामांकन सोहळ्यात सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते-केळकर, ईशा केसकर, हार्दिक जोशी, अक्षय देवधर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, धनश्री काडगांवकर, नितीश चव्हाण, शिवानी बावकर, गायत्री दातार, अभिज्ञा भावे, निर्मिती सावंत, महेश कोठारे, श्रुती मराठे यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 01

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 02

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 03

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 04

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 05

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 06

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 07

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 08

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 09

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 10

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 11

Zee Marathi Awards 2018 Nominations Party Photo 12

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement