Events

झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे तर प्रेक्षकांसोबत अनेक कार्यक्रमांद्वारे देखील एक वेगळं व घट्ट नातं निर्माण केलं आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच वाहिनीने वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या मालिका आणि ऑनग्राउंड इव्हेंट्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑक्टोबरला 'सिद्धिविनायक प्रतिष्ठान' च्या सहकार्याने, 'झी युवा दांडिया २०१८'चे आयोजन केले आणि या कार्यक्रमाला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. झी युवाने सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकार आणि प्रेक्षक दोघांची नवरात्र अजूनच उत्साहपूर्ण बनवली.

Zee Yuva Dandiya 2018 Photo 01

ठाण्यात पार पडलेल्या या दांडिया कार्यक्रमात झी युवावरील लोकप्रिय कार्यक्रम फुलपाखरू मधील हृता दुर्गुळे व यशोमन आपटे, आम्ही दोघी मालिकेतील प्रसिद्धी किशोर, खुशबू तावडे, बापमाणूस मधील सुयश टिळक, पल्लवी पाटील आणि श्रुती अत्रे तसेच नवीनच सुरु झालेल्या मालिका सूर राहू दे आणि तू अशी जवळी रहा मधील कलाकार गौरी नलावडे, संग्राम साळवी, तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके हे उपस्थित होते. देवीचा आशीर्वाद घेऊन या सर्व कलाकारांनी मनसोक्त गरबा आणि दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. तसेच प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून सर्व कलाकारांनी त्यांचे आभार देखील मानले.

Zee Yuva Dandiya 2018 Photo 03

Zee Yuva Dandiya 2018 Photo 04

Zee Yuva Dandiya 2018 Photo 05

Zee Yuva Dandiya 2018 Photo 06

Zee Yuva Dandiya 2018 Photo 07

Zee Yuva Dandiya 2018 Photo 08

Zee Yuva Dandiya 2018 Photo 09

Zee Yuva Dandiya 2018 Photo 10

Zee Yuva Dandiya 2018 Photo 11

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement