गेली ४९ वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४९ वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे. ‘सम्राट सराफ’ २४ ते ३० सप्टेंबर असं सप्ताहभर चालणार असून २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी ३ वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं.१’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पोलिसांच्या संवेदना दर्शवणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटानी सप्ताहाची सांगता होणार आहे.

संपूर्ण आठवडा प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या कलर्स मराठीवरील आवडत्या मालिका या सोमवारी घेऊन येणार आहेत खास भाग. म्हणजेच प्रेक्षकांसाठी पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी २४ सप्टेंबरला संध्या ७ वाजल्यापासून असणार आहे मनोरंजनाची पर्वणी. प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांमध्ये घडणार आहेत बऱ्याच घटना. लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांना येणार आहे रंजक वळण. प्रेक्षकांना देखील हे विशेष भाग बघण्याची बरीच उत्सुकता असते. तेंव्हा तुमच्या आवडत्या मालिकेमध्ये काय घडणार आहे, कोणते नवे वळण येणार आहे हे बघायला विसरू नका सुपरहिट सोमवारमध्ये २४ सप्टेंबरला संध्या. ७ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

सध्या 'आम्ही दोघी' मालिकेत प्रेक्षक मधुरा, मीरा आणि आदित्य चा लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की आदित्यने मीराबद्दलच्या भावना व्यक्त केल्यावर मधुराने देखील तिला आदित्य आवडतं असल्याचं सगळ्यांसमोर कबूल केलं. फक्त कबूलच नाही तर तो फक्त तिचाच आहे असं ठणकावून सगळ्यांना सांगितलं.

‘लाखात एक आपला फौजी’असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागिरं झालं जी’ या ‘झी मराठी’वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. सध्या मालिकेत अजिंक्यचं पोस्टिंग आसामला झालंय आणि तिथे तो मन लावून त्याचं काम करतोय. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की शीतल आणि अजिंक्य आसाममध्ये गणेशोत्सव साजरा करत आहेत.

नुकतंच 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आणि त्यामुळे मालिका अजूनच रंजक बनत चालली आहे. शनाया राधिकाचा बदला घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शानयाच्या अशाच एका चालीमुळे राधिकाच्या अपघात झाला. राधिका शनायामुळे तिच्या जीवाला मुकणार का? तर आगामी भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत कि राधिका तिच्या अपघातामुळे कोमामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे राधिकाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.

‘नजरेत दया हृदयात माया
कटेवरी हात विठ्ठलाचे
चिपळीचा नाद मृदुंगाचा ताल
वारकरी नाचती पंढरीचे’

Advertisement