News
Typography

कलर्स मराठीवरच्या घाडगे & सून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. घाडगेंच्या घरात सध्या भक्तिमय वातावरण आहे. जीवघेण्या अपघातातून बचावलेल्या अक्षयसाठी आणि अक्षय-अमृताचं नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी माईंनी जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतलाय. घाद्गेंच्या परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर एकदा जोड्याने जाऊन खंडोबाचे आशीर्वाद घ्यायचे असतात. पण लग्नापासूनच अक्षय-अमृताच्या लग्नात अनेक विघ्न आल्याने हा पारंपारिक विधी मात्र राहून गेला होता. मात्र नवस पूर्ण करण्याच्या निमित्ताने आता या विधीसाठी संपूर्ण घाडगे कुटुंब जेजुरीसाठी रवाना झालंय.

ह्या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात. पण अक्षयला मात्र हा विधी अमृतासोबत करण थोडसं कठीण जातंय. तर तिकडे अक्षयच्या प्रेमात पडलेल्या अमृतासाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे. खंडोबाच्या दर्श्नासोबतच अक्षय-अमृताच्या लग्नाचा जागरण-गोंधळाचा विधीही पार पडणार आहे. आता अक्षय हा विधी करणार का? अमृताला उचलून अक्षय हि परंपरा निभावणार का? खंडोबाच्या आशिर्वादाने अक्षय-अमृताचं नातं खुलणार का? हे सगळ जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका १२ ते १८ फेब्रुवारी रात्री ८:३० वा. 'घाडगे & सून' चा जेजुरी स्पेशल सप्ताह फक्त कलर्स मराठीवर.

अखेर अक्षय अपघातातून सुखरूप बचावाल्यानंतर मृदालाने बोललेला नवस फेडण्यासाठी अखेर घाडगे जेजुरीला जायला निघालेत. देव दर्शनासोबतचं घाद्ग्यांच्या जुन्या गावातल्या घरातले घाद्गेंचे काही सुंदर क्षण अमृतलाहि अनुभवायला मिळणार आहे. चुलीवर जेवण शिजवण, चांदण्या रात्रीत मोकळ्या अंगणात गप्पा, अक्षयसोबत घालवलेले काही निवांत क्षण ह्यामुळे कदाचित अक्षय-अमृताचं नातहि अजून खुलेल. तर दुसरीकडे अमृताच्या विरोधात असलेली वसुधा कुठली नवी खेळी खेळणार आहे. रिती-भाती शिकता-शिकता अमृता घाद्ग्यांचे संस्कार, परंपरा कशा शिकणार अशी सगळी धमाल पाहायला मिळणार आहे.

Ghadge and Suun Jejuri 02

Ghadge and Suun Jejuri 03

Ghadge and Suun Jejuri 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement