News
Typography

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा' हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच यातील सेलेब्रिटी गायक आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहेत. लोकसंगीत असो, शास्त्रीय संगीत असो वा वेस्टर्न संगीत असो या गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करून प्रत्येक भागामध्ये कॅप्टनसना तसेच मंचावर आलेल्या विशेष अतिथींना एक आश्चर्याचा सुखद धक्काही दिला आहे. या स्पर्धकांमधीलच एक जिने आपल्या सुमधुर गायकीने, सुरांनी प्रेक्षकांना आपलेसे केले आहे अशी सगळ्यांचीच लाडकी शरयू दाते ही गाण्याबरोबरच उत्तम चित्र देखील काढते. “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये शरयूने भारतरत्न लता दीदी यांचे काढलेले एक सुंदर स्केच प्रेक्षकांना दाखवले. इतकेच नव्हे तर याव्यतिरिक्त देखील तिने तिच्या गुरु आरती अंकलीकर यांचे स्केच देखील काढले आहे.

“सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमातील गायिका शरयू दाते जोपासते चित्रकलेचादेखील ध्यास!

शरयूला चित्रकला खूप आवडत असून तिने त्याच्या संबंधीतील परीक्षेमध्ये “A” Grade मिळवला आहे. “गाण्याबरोबरच मला चित्रकला, स्केच काढयला खूप आवडते. मला जसा वेळ मिळेल तसं मी चित्र काढते. सध्या वेळेच्या अभावी मला तितकासा वेळ नाही देता येतं. पण माझा नेहेमीच प्रयत्न असतो वेळ देण्याचा”. असं शरयू म्हणाली. शरयूने सूर नवा कार्यक्रमामध्ये अनेक सुंदर गाणी गाऊन कॅप्टनसची आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. पण, आपला मानूसचित्रपटासाठी नुकतेच नाना पाटेकर हे या कार्यक्रमामध्ये येऊन गेले तेंव्हा तिने सादर केलेले सहेला रे हे किशोरी आमोणकर यांचे गाणे गाऊन तिने नानांचे मन जिंकले होते.

शरयूची तसेच बाकीच्या स्पर्धकांची अशीच सुंदर गाणी ऐकण्यासाठी बघत रहा सूर नवा ध्यास नवा सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Here are the Photos of Lata Didi's sketch by Sharayu Date.

Sharayu Date Sketches Lata Didi 01

Sharayu Date Sketches Lata Didi 02

Sharayu Date Sketches Lata Didi 03

Sharayu Date Sketches Lata Didi 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)