News
Typography

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये अमृता आणि अक्षय नुकतेच जेजुरीहून परतले आहेत. आणि आता घाडगे परिवारामध्ये चाहूल लागली आहे ती म्हणजे होळी आणि रंगपंचमीची या सणाची... घाडगे सदनमध्ये प्रत्येक सण जोरात आणि धुमधडाक्यात साजरा केला जातो. अक्षय आणि अमृताची हि पहिलीच रंगपंचमी म्हणजे ती ईतर सणांप्रमाणे जोरात साजरी होणार यात शंकाच नाही. होळीच्या आगीमध्ये वाईट विचार, संकंट जाळून राख करावी अशी मान्यता आहे. या होळी आणि रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आणि अमृताच्या आयुष्यातील सगळी संकंट दूर होऊन या दोघांवर प्रेमाचा रंग चढेल ? हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका घाडगे & सूनचा “रंगपंचमी विशेष” अक्षय आणि अमृताबरोबर २८ फेब्रुवारी ते ५ मार्च रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

कियाराचे लग्न अर्जुनशी झाले आहे ही बातमी अक्षयला कळताच अक्षय अस्वस्थ होतो... पण, ते लग्न कुठल्या परिस्थितीत झाले आहे हे अक्षयला अजूनही कळलेले नाही. परंतु घाडगे परिवारामध्ये अत्यंत आनंदी वातावरण आहे. तर, अमृता मात्र अक्षयसाठी खूप चिंतीत आहे, कि अक्षय आता काय करेल ? हा प्रश्न अमृताला राहून राहून त्रास देतो आहे. पण, रंगपंचमीच्या शुभ मुहूर्तावर अक्षय अमृताला एक सरप्राईझ देणार आहे. किचनमधल्या रोजच्या वापरातल्या गोष्टींचा एक वेगळा रंग तो अमृताला दाखवणार आहे. आता हे सरप्राईझ काय असणार आहे ? नक्की अक्षय काय करणार आहे ? तर रंगपंचमीच्या मुहूर्तावर अमृतावर चढणार का अक्षयचा प्रेमाचा अनोखा रंग ?

Ghadge and Suun Holi Special 2018 02

Ghadge and Suun Holi Special 2018 03

Ghadge and Suun Holi Special 2018 04

Ghadge and Suun Holi Special 2018 05

Ghadge and Suun Holi Special 2018 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement