News
Typography

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये राधाचा कान आता बरा झाला असून ती प्रेम अजूनही राधाच्याच माहेरी रहात आहे.. राधाला मनविण्यासाठी. प्रेमचे राधा प्रती वागणे पूर्णपणे बदलले असून तो राधाची काळजी करु लागला आहे आणि हे आपल्या नात्यासाठी धोकादायक असल्याची भावना दिपीकाच्या मनामध्ये घर करून बसली आहे. येत्या होळी आणि रंगपंचमीच्या आठवड्यामध्ये दीपिका एक नवी खेळी खेळणार आहे ज्यामध्ये प्रेम आणि राधा अडकेल का ? प्रेमला दिपिकाचे सत्य कळेल का ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली होळी आणि रंगपंचमी विशेष भाग सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

या वर्षीची होळी निंबाळकरांच्या परिवारामध्ये जोश्यात साजरी होणार आहे कारण राधा- प्रेम तसेच अन्विता – आदित्य यांची लग्नानंतरची ही पहिलीच होळी आहे. या होळी सेलिब्रेशनसाठी सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमा मधील प्रेक्षकांचे लाडके प्रेसेनजीत कोसंबी आणि विश्वजित बोरवणकर निंबाळकरांच्या घरी रंगपंचमी साजरी करायला जाणार आहेत. ज्यामध्ये हे दोघे त्यांची ये ग ये ये मैना, देखा ना हाय रे आणि प्रीतीचा विंचू ही दमदार गाणीदेखील सादर करणार आहेत. तेंव्हा राधा प्रेम रंगी रंगलीचा हा होळी आणि रंगपंचमी विशेष भाग रंजक असणार आहे यात शंका नाही. या सगळ्या आनंदमयी वातावरणामध्ये दिपिका आपले कारस्थान रचणार आहे ज्यामध्ये ती प्रेम आणि राधाला ती गरोदर असल्याचे सांगणार आहे. परंतु तिने राधाला हे सांगितलेले नाही कि ही गोष्ट प्रेमला माहिती आहे ईतकेच नसून ती राधाला धमकी देखील देते कि तिने हि गोष्ट प्रेमला सांगू नये. आता प्रेमला दिपिकाचे हे कारस्थान कळल्यावर तो काय करेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली होळी आणि रंगपंचमी विशेष भाग सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 02

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 03

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 04

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 05

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 06

Radha Prem Rangi Rangli Holi 2018 07

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement