News
Typography

तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावून मराठी चित्रपटाचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर फडकावणाऱ्या ‘बाबू बँड बाजा’ हा चित्रपट आता प्रथमच टेलिव्हिजनवर पाहता येणार आहे. रविवारी ४ मार्चला दुपारी १:00 आणि सायं. ७:00 वाजता या चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. प्रेक्षकांना आपलेसे वाटेल अशी विषय मांडण्याची पद्धत, कलाकारांनी जीव ओतून साकारलेल्या भूमिका यामुळे हा चित्रपट विशेष गाजला.

राजेश पिंजानी दिग्दर्शित या चित्रपटात मिलिंद शिंदे, मिताली जगताप, विवेक चाबुकस्वार, नम्रता आवटे, संजय कुलकर्णी, राजेश भोसले आदि अभिनय संपन्न कलाकारांच्या भूमिका आहेत. शंतनू रोडे यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. लिखाणात त्यांनी वापरलेले धक्का तंत्र हे या चित्रपटाचे वेगळेपण आहे. रोहित नागभिडे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक महोत्सवांमध्ये या चित्रपटाचा विविध पुरस्कारांनी सन्मान झाला आहे. जन्म-मृत्यू पासून जीवनातल्या प्रत्येक प्रसंगाचा भाग असणाऱ्या, आपल्या सुरावटींनी लोकांना बेभान होऊन नाचायला लावणाऱ्या बँडवाल्यांची त्यांच्या जगण्याच्या संघर्षाची आशावादी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

Promo

संवेदनशील कथानक, उत्तम कलाकारांचा कसदार अभिनय या चित्रपटात पहायला मिळेल. मिलिंद शिंदे,मिताली जगताप आणि विवेक चाबुकस्वार यांचा नैसर्गिक अभिनय प्रेक्षकांवर जादू करतो. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाचा गौरव झाला होता. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी मिताली जगताप, सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून विवेक चाबुकस्वार यांना पुरस्कार मिळाला होता. तसंच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचाही पुरस्कार ‘बाबू बँड बाजा’ नं पटकावला होता.

ग्रामीण जीवनाचा, बँडवाल्यांच्या आयुष्याचा पदर उलगडणारा, एक रसरशीत जीवनानुभव देणाऱ्या या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर न चुकता पहा रविवारी ४ मार्च रोजी दुपारी १:00 आणि सायं. ७:00 वाजता फक्त स्टार प्रवाहवर !

Baboo Band Baja Still 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement