News
Typography

“राधा प्रेम रंगी रंगली” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. उत्कृष्ट अभिनय, आपल्या कुटुंबावर निस्वार्थीपणाने प्रेम करणाऱ्या राधाने म्हणजेच वीणा जगताप ने आपल्या सोज्वळ स्वभाव आणि नाजूक बोलण्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच १३ वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सचित पाटील म्हणजेच प्रेम याचा सहज अभिनय, तो साकारत असलेला प्रेम, दीपिका म्हणजेच अर्चना निपाणकर हिचे खोचक बोलणारे, विश्वनाथचा तडफदार खेळ या सगळ्यालाच प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतं आहे. तसेच कमी कलावधीत यामधील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच या मालिकेने १०० भाग पूर्ण केले आहेत.

या मालिकेतील सर्वच कलाकारांनी १०० एपिसोड पूर्ण झाल्यामुळे मोठया उत्साहात सेटवर केक कापला. कलाकारांना झालेला आनंद त्यांच्या सेल्फीमधून दिसतो आहे. याचबरोबर मालिकेमध्ये येत्या काही भागांमध्ये बरेचसे ट्वीस्ट येणार आहेत. श्रावणी काकुच्या वारंवार अन्विताला घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढले. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकुला शोधायला घराबाहेर पडतात. राधा श्रावणीला काकुला समजवण्याचा खूप प्रयत्न करते, पण हे होत असतानाच राधावर काही गुंड हल्ला करतात. आता पुढे काय होणार ? श्रावणी काकू घरी परतणार का ? राधा आणि श्रावणी काकू कसं गुंड्यापासून स्वत:ला वाचवणार ? दीपिका प्रेमला आपलसं करण्यासाठी कोणती खेळी खेळणार हे बघणे रंजक असणार आहे.

यावर बोलताना सचितने सांगितले, “राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचे गेल्या काही आठवड्यापासून शूट सुरु आहे. ज्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमने खूप मेहनत घेत आहेत. एक मालिका यशस्वी होण्यामागे संपूर्ण टीमची मेहनत असते. आम्ही कलाकार प्रेक्षकांना रोज भेटतो पण, स्पॉट दादा, टेक्नीकल टीम, आमचे दिग्दर्शक हे पडद्यामागचे जे खरे कलाकार आहेत जे दिवस रात्र मेहेनत घेतात त्यांचे कौतुक आहे, हे सगळे हा शिवधनुष्य खूप छान पेलत आहेत. रसिक प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आज आम्ही १०० एपिसोड पूर्ण केले आहेत, असेच प्रेम आमच्या संपूर्ण टीमवर करत रहा ईतकीच इच्छा.”

तेंव्हा बघायला विसरू नका 'राधा प्रेम रंगी रंगली' सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 02

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 03

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 04

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 05

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 06

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 07

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 08

Radha Prem Rangi Rangli 100 Episodes 09

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement