News
Typography

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. सुपरहिट मराठी सिनेमा - गुलाबजामचे कलाकार, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर झी युवा वरील डान्स महाराष्ट्र डान्समध्ये येणार आहेत हे कळाल्यावर सर्वांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती.

जेन नेक्स्ट अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि होस्ट सुव्रत जोशी यांच्या कॉमिक टायमिंगने सर्वांचे खळखळून हसवले. स्पर्धकां सोबत डान्सकरण्यापासून ते त्यांना प्रोत्साहन देण्यापर्यंत, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकरने डान्स महाराष्ट्र डान्सच्या सेटवर खूप मजा केली. या आठवड्यात प्रेक्षकांना डान्स महाराष्ट्र डान्समध्ये भव्यता पहायला आणि अनुभवायला मिळणार आहे कारण स्पर्धक मोठ्या प्रॉप्सचा वापर करून परफॉर्म करणार आहेत. सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर सेलिब्रिटी जज म्हणून या आठवड्यात येणार असल्यामुळे स्पर्धकांसाठी अनेक सरप्राइज असणार आहेत.

तरमग पहायला विसरू नका, डान्स महाराष्ट्र डान्स बुधवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता फक्त झी युवा वर.

Gulabjaam on Dance Maharashtra Stage 02

Gulabjaam on Dance Maharashtra Stage 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News