News
Typography

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. महाराष्ट्राचा लाडका आणि लोकप्रिय गायक आदर्श शिंदे डान्स महाराष्ट्र डान्सच्या आगामी एपिसोड मध्ये विशेष अतिथीच्या रूपात पहायला मिळणार आहे.

कार्यक्रमातील एकसे बढकर एक स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. आगामी एपिसोडमध्ये स्पर्धक आदर्श शिंदेच्या सर्व गाण्यांवर परफॉर्म करताना दिसणार आहेत. मागील आठवड्यात सिध्दार्थ जाधवच्या डोळ्यात अश्रू आणणारा द फील ग्रुप यावेळीसुध्दा सैराट मधील डायलॉग्सवर परफॉर्म करून परत एकदा त्यांच्या अफलातून परफॉर्मन्सनी परीक्षकांना आश्चर्यचकित करणार आहेत. तर दुसरीकडे, वाय 3 डान्स होलिक्स दार उघड या ब्लॉकबस्टर गाण्यावरील त्यांच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहेत, आणि परीक्षकांकडून परफॉर्मर ऑफ द वीक हा सन्मान मिळविणार आहे.

तर मग पहायला विसरू नका 'डान्स महाराष्ट्र डान्स' प्रत्येक बुधवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता फक्त झी युवा वर

Dance Maharashtra Dance Adarsh Shinde 03

Dance Maharashtra Dance Adarsh Shinde 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement