News
Typography

विश्वदौऱ्या नंतर जगभरात पोहोचलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ त्याच्या मूळ रूपात रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. पण या कार्यक्रमातील थुकरट वाडीचं आता एक आदर्श गाव झालेलं असून या आदर्श गावाला भेट देण्यासाठी पहिले पाहुणे आले ते म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम वाहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकर आणि त्यांची सौ सुचित्रा बांदेकर.

या भागाचे अजून एक विशेष आकर्षण म्हणजे, या भागात होम मिनिस्टर मध्ये सहभागी झालेल्या वहिनींनी त्यांनी होम मिनिस्टर मध्ये जिंकलेल्या पैठणी साड्या नेसून मंचावर हजर झाल्या आणि त्यांनी आदेश भावोजी आणि सुचित्रा वाहिनीचं औक्षण केलं. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या शुभहस्ते या नव्या सेटचे उदघाटन करण्यात आले.

Home Minister on Chala Hava Yeu Dya 02

धमाल मजा मस्तीत रंगलेल्या या भागात आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांनी 'सैराट झाला जी' या गाण्यावर नृत्य देखील केले. चला हवा येऊ द्या ची अतरंगी टीम आणि आदेश भावोजी यांच्या रंगलेली जुगलबंदी तसेच थुकरट वाडीतील वांदेकर भावोजी आणि ओरिजनल बांदेकर भावोजी यांचा आमना सामना पाहणे रंजक ठरेल आणि प्रेक्षकांना त्यांचा लाफ्टर डोस मिळेल यात शंकाच नाही.

'चला हवा येऊ द्या' चा हा भाग तुम्हाला पाहता येणार आहे, १६ आणि १७ एप्रिल रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Home Minister on Chala Hava Yeu Dya 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement