News
Typography

लोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.

राधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का सौमित्र?

गुरु आणि शनाया देखील तिकडे त्यांना धडकणारआहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे. त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथ ने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनीमध्ये ५० - ५०% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय युक्त्या लढवतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का? हे पाहणे रंजक ठरेल.

तेव्हा पाहायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवार १५ एप्रिल संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Shirdi Photos

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 01

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 02

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 03

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 04

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 05

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 06

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 07

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 08

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 09

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 10

Majhya Navaryachi Bayko Shirdi Visit 11

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement