News
Typography

बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता आणि इच्छा प्रत्येकाची असते. पण ९० – १०० दिवस तिथे रहाणे हे काही सोपे नसते. घरच्यांना, आपल्या प्रिय व्यक्तींना मागे सोडून ईतके दिवस त्यांच्याशिवाय रहायचे काही सोपे नसते. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला विनीत भोंडेची मंचावर एन्ट्री झाल्यानंतर त्याला एक सुंदर सरप्राईझ मिळाले. महेश मांजरेकर यांनी विनीत भोंडे यांच्या पत्नीला मंचावर बोलावले आणि विनिताला हे ऐकताच विश्वास बसेना पण, प्रत्यक्ष आपल्या पत्नीस मंचावर बघितल्यावर त्याला खूपच आनंद झाला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर त्याची पत्नी खास त्याला भेटण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर आली होती.

विनीतचे नुकतेच लग्न झाले असून त्याला लग्नानंतर काही दिवसताच बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची विचारणा झाली. पण, लग्न झाल्यानंतर लगचेच ईतके दिवस बायकोपासून दूर कसं रहाणार ? हा प्रश्न समोर होताच. पण बायकोने कामास प्राधान्य दिले आणि मला कार्यक्रमामध्ये भाग घेण्यास पाठींबा दिला. मी माझ्या बायकोमुळेच या मंचावर आहे असे तो म्हणाला. विनीतच्या बायकोने त्याला एक छानसा कुटंबासोबतचा फोटो घरी घेऊन जाण्यास दिला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाणारा दुसरा सदस्य होता, त्याआधी रेशम टिपणीस घरामध्ये गेली होती.

Bigg Boss Premiere Vineet Bhonde 02

विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाताच त्याला घरातील प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल आहे हे दिसून आले आणि प्रत्येक गोष्टी तो खूपच बारकाईने बघत होता. त्याच्यानंतर आलेल्या प्रत्येक सदस्याला त्याने स्वत: बिग बॉसचे घर दाखवले. घरातील प्रत्येक कोपऱ्यास आणि प्रत्येक भागाला त्याने खूपच गमतीशीर प्रकारे प्रत्येकाला दाखविले. विनीतचे प्रश्न, त्याचा हजरजवाबीपणा, त्याचा मिश्कील स्वभाव प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही !

या घरामध्ये पुढे काय होणार आहे, कोण कसा वागणार आहे हे कोणीच कधीच सांगू शकत नाही. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस – कलर्स मराठीवर.

Bigg Boss Premiere Vineet Bhonde 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement