News
Typography

बिग बॉसचा पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग बॉससारखीच मराठीच्या या पर्वाच्या दिवसाची सुरुवातदेखील गाण्याने झाली. बिग बॉसच्या नियमानुसार पहिल्याच दिवशी सगळं सामान घरातील सदस्यांना देता येत नाही. पहिला दिवस असल्यामुळे सगळेच आपल्या सामनाशिवाय रहात होते. चहा – पाण्याची आणि सकाळच्या नाशत्याची सोय बिग बॉसने करून ठेवली होती. गाणं वाजण्याअगोदर घरामधील बरेचसे सदस्य उठले होते. काही गप्पा मारत होते तर काही सकाळचा व्यायाम करत होते. जुई गडकरी हिने सगळ्यांसाठी नाश्ता बनविला. दिवस उशिरा सुरु झाल्याने दुपारचं जेवण देखील उशिराच झालं. मध्ये मध्ये होणाऱ्या गप्पांमध्ये मेघा धाडेने तिला स्वयंपाक करायला आणि किचनचे सामान लावायला खूप आवडते असे म्हंटले. जुईला जेवण तर येते पण तिच्या एका वाक्यावर सगळ्यांच हसू आले. “मला फक्त एका वेळी एकाच व्यक्तीसाठी चहा बनवता येतो. त्यामुळे १५ जणांसाठी मला चहा १५ वेळा बनवायला लागणार”.

पहिला दिवस असल्याने, बिग बॉसने नियम पत्र पाठवले होते जे मेघा धाडे हिने घरच्या सदस्यांना वाचून दाखविले. तसेच, काही वेळातच किचनचे समान देखील घरच्यांना मिळाले. गप्पा गप्पा मध्ये आरतीने पुष्कर मला आवडायचा हे घरच्यांसमोर सांगताच सगळ्यानी पुष्कर – आरतीला चिडवायला सुरुवात केली.

घरामध्ये येताच मनोरंजनाचा तडका Glam गर्लनी देण्यास सुरुवात केली आहे... मेघा, सई, रेशम, जुई यामध्ये कोण जास्त Glamorous दिसणार यामध्ये चढाओढ सुरु होणार आहे. किचनमध्ये स्वयंपाक करत असताना रेशम, उषा नाडकर्णी अणि आरती सोलंकी हीने घरातील इतर मुलींना वेगळी वेगळी नावं ठेवण्यास सुरुवात केली . त्यामुळे जसजसे दिवस पुढे जाणार तसतशी ही स्पर्धा हां खेळ अजुनच रंगत जाणार यात शंका नाही.

स्पर्धक वाट बघत असलेली गोष्ट शेवटी बिग बॉसने सांगितली. बिग बॉस मराठी मधील पहिली परीक्षा आणि घरातील सदस्यांमधील अपात्र नावं सर्वानुमताने घोषित करण्याचा संदेशने बिग बॉसने दिला... आता कोण कोणाचं नावं घेणार ? परीक्षा काय असणार ? कोण जिंकणार ? हे बघा कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा.

Day 01 - Highlights

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement