News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर नुकताच पार पडला. याचवेळेस बिग बॉस कार्यक्रमातील स्पर्धकांची एन्ट्री घरामध्ये झाली. ज्यामध्ये पुष्कर जोग, सरस्वती मालिकेमधील राघव म्हणजे आस्ताद काळे तसेच देविका ही भूमिका साकारलेली आवडती जुई गडकरी, रेशम टिपणीस, मेघा धाडे, आरती सोलंकी, सई लोकूर हे कलाकार होते. घरामध्ये जाण्यापूर्वी या सगळ्यांच्या सामानांची तपासणी झाली. या तपासणीमध्ये काही अतरंगी गोष्टी मिळाल्या. प्रत्येक कलाकार आपल्या फिटनेस बद्दल तसेच आपण कसे दिसतो आहे याबद्दल खूपच सतर्क असतात. बिग बॉसच्या घरामध्ये १०० दिवस रहायचे म्हणजे हे कलाकार सगळ्या छोट्या – मोठ्या गोष्टी घेऊन येणार हे तर नक्कीच ! पण या घरामध्ये तुम्ही आणलेल्या सगळ्याच गोष्टी घरामध्ये घेऊन जाण्यास परवानगी नसते. कलाकारांनी आणलेल्या काही गोष्टी त्यांना घरामध्ये घेऊन जाण्यास मनाई केली गेली तर काही त्यांच्यासोबत पाठविण्यात आल्या.

कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेतील आस्ताद काळे याने बिग बॉसच्या घरात जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणल्या ज्यामध्ये २० हून अधिक perfumes चा समावेश होता. तसेच पुष्कर जोग याने भरपूर Hair Products आणले होते. याच बरोबर कार्यक्रमधील मुलीदेखील बऱ्याच गोष्टी बरोबर घेऊन आल्या होत्या. मुलींना soft toys किती आवडतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही, जुई गडकरी हिला बिग बॉसच्या घरामध्ये एक मोठा तिला प्रिय असा Soft Toy घेऊन जायचा होता तर ऋतुजा धर्माधीकारीला तिचा एक जुना चमचा घेऊन जाण्याची इच्छा होती, कारण ती दुसऱ्या कोणीही वापरलेला चमचा वापरत नाही. अनिल थत्ते यांनी एक वेगळ्याच प्रकारची टोपी आणली आहे जी त्यांना घरामध्ये घेऊन जायची होती, आणि घराचा जो कोणी captain होईल त्याला ते ही कॅप देणार होते. अशाप्रकारच्या अनेक गोष्टी या स्पर्धक कलाकारांच्या bag मध्ये सापडल्या होत्या.

बिग बॉसच्या घरामध्ये यातील काही गोष्टी त्यांना परत मिळतील देखील पण, मोबाईल, टेलिव्हीजन, वर्तमानपत्र, त्यांची घरातील प्रिय मंडळी या व्यतिरिक्त हे कसे रहातील हे बघण्यासारखे असेल !

तेंव्हा बघायला विसरू नका महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री बिग बॉसमध्ये आणि बिग बॉसच मराठमोळं रुपं १५ एप्रिल रोजी संध्या. ७ वा. तसेच त्यानंतरचे भाग दर सोम ते शनि रात्री ९.३० तसेच रविवारी ९.०० वा.फक्त कलर्स मराठीवर.

Bigg Boss Premiere Wierd Things 02

Bigg Boss Premiere Wierd Things 03

Bigg Boss Premiere Wierd Things 04

2.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 2.50 (1 Vote)
Advertisement