News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये विनीत भोंडे हा पहिला कॅप्टन होता. पण, आता एक आठवड्याचा कालावधी संपला असून घराचा दुसरा कॅप्टन निवडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बिग बॉसने घरामधील सर्व सदस्यांना एकत्र बोलावून आता नवीन कॅप्टनची घोषणा करणार आहे आणि कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया देखील सांगणार आहेत. या आठवड्यात झालेल्या प्रार्थना यज्ञ आणि इतर टीम टास्क मध्ये ज्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले त्यांना कॅप्टन बनण्याची संधी देण्यात येणार आहेत.

बिग बॉसच्या घरामधील सदस्य आता कोणाला कॅप्टन बनण्याची संधी देतील ? ही कॅप्टन निवडण्याची प्रक्रिया अशी असेल ? कोणता स्पर्धक कोणाला संधी देईल ? घरामध्ये ग्रुप तयार झाले आहेत त्यामुळे आता कॅप्टन निवडण्याच्या प्रक्रियामध्ये कोणत्या प्रकारचा माइंड स्पर्धक खेळतील ? हे बघणे रंजक असणार आहे.

Day 04 Bigg Boss Marathi 01

विनीत भोंडे बिग बॉस घरामध्ये चर्चेचा विषय बनला असून, घरातील बरेचसे सदस्यांना त्यांचे वागणे पटत नसल्याचे प्रेक्षकांना दिसून येत आहे. एकीकडे उषाजी विनीतला वारंवार सांगत असतात कि त्याने आपल्या बोलण्यावर आणि आवाजावर सयंम ठेवण्याची गरज आहे. हे घडत असताना विनीत भोंडेला बिग बॉसने कन्फेशन रूमध्ये बोलविण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस त्याला एक सिक्रेट टास्क देण्यात येणार आहे. टास्कनुसार विनीतला कुठल्याही चार स्पर्धकांना हे बोलण्यास तयार करायचे आहे कि विनीत किती चांगला कॅप्टन आहे. आता विनीत हा टास्क कसा पूर्ण करेल ? कसे बाकीच्या स्पर्धकांना तयार करेल ? कोणत्या अडचणी येतील हे बघणे मनोरंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस सोम ते शनि रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement