News
Typography

अगदी कमी वेळातच युथफूल कन्टेन्टने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या झी युवा या वाहिनीने नेहमीच वेगवेगळे विषय हाताळले आहेत. थोर समाजसुधारक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समाज आणि व्यवस्था सुधारण्यासाठी केलेले मोलाचे योगदान लक्षात ठेवून झी युवाने त्यांना मानवंदना दिली. त्यासाठी झी युवाने कोल्हापूर शहरात एक कार्यक्रम आयोजित केला. ३ पिढ्या संगीत क्षेत्रात पारंगत असलेल्या शिंदे परिवाराने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. येत्या रविवारी प्रेक्षकांना मनोरंजनाचा डबल डोस मिळणार आहे कारण मानवंदना झी युवावर दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होणार आहे.

संगीताचा वारसा लाभलेले एका पेक्षा एक गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मिलिंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, मधुर शिंदे, संकर्षण शिंदे आणि आल्हाद शिंदे यांनी शिवाजी महाराज आणि बाबा आंबेडकर यांना समर्पित करून गाणी गायली. गायिका सायली पंकज देखील या कार्यक्रमाचा भाग होती. विश्वास नांगरे पाटील यांनी देखील एक कविता सादर केली. आपल्या धकाधकीच्या जीवनात आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या महामानवाचे उपकार आपण विसरतो पण झी युवा 'मानवंदना' या कार्यक्रमाद्वारे त्याची आठवण सर्वांना करून देणार आहे.

तेव्हा पाहायला विसरू नका मानवंदना २२ एप्रिल रविवार दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त झी युवा वर!

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement