News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या Weekend चा डावमध्ये कोणी एक सदस्य घरामधून बाहेर जाणार आहे, या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये आहे. या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली असणार हे नक्की. बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला कोणतरी एक सदस्य घरा बाहेर हे निश्चित. या घरामध्ये टिकायचं असेल तर संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची असते. या पहिल्या आठवड्यामध्ये महेश मांजरेकरांनी पहिले ६-७ दिवस स्पर्धकांचे कसे गेले ? स्पर्धकांची एकमेकांबद्दलची मते ? त्यांना खटकत असलेल्या गोष्टी, घरामध्ये होणारी भांडण, तसेच घरामध्ये पडणारे ग्रुप ? कोण कुठे चुकले ? अश्या अनेक विषयांवर मनमोकळे पणाने चर्चा केली. स्पर्धकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांना आपली मते प्रेक्षकांसमोर तसेच घरच्यांसमोर मांडण्याची संधी दिली. या पहिल्या Weekend चा डावमध्ये रविवारी स्पर्धकांच्या राशींबद्दल माहिती सांगण्यासाठी येणार आहेत ज्योतीश्याचार्य आणि राशीचक्र या कार्यक्रमाचे विक्रमी ३००० प्रयोग केलेले श्री. शरद उपाध्ये. तेंव्हा बघायला विसरू नका “बिग बॉस मराठी - Weekend चा डाव रविवारी रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

शरद उपाध्ये यांनी मंचावर महेश मांजरेकर यांच्याशी हितगुज साधल्यानंतर, स्पर्धकांशी संवाद साधला. “बिग बॉस हा कार्यक्रम उत्तम आहे, हे १५ स्पर्धक १०० दिवस या घरामध्ये रहाणार. बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नसताना इतके दिवस रहाणे म्हणजे खूप मोठे मानसिक बळ लागते. मी या कार्यक्रमाला बघून भावून गेलो" अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. स्पर्धकांच्या मनात असलेल्या अनेक शंकांचे त्यांनी निरसन केले. कोणी घरामध्ये कसे वागावे, घरामध्ये नक्की टिकण्यासाठी काय करावे, कोणाची राशी काय सांगते, त्यांचा बिग बॉसच्या घरामध्ये कसा निभाव लागेल ? घरामध्ये टिकण्यासाठी त्यांनी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ? अश्या अनेक गोष्टी सांगितल्या. जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे, स्मिता गोंदकर, उषा नाडकर्णी आणि अनिल थत्ते यांच्यासोबत त्यांनी संवाद साधला आणि घरातील सगळ्यांना मोलाचे सल्ले दिले.

घरातून बाहेर गेलेल्या सदस्यामुळे आता घरामध्ये नक्की कोणता बदल येईल ? रहिवाश्यांच्या मनात मध्ये काय सुरू आहे ? येणाऱ्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? कोण बनेल घराचा नवा कॅप्टन ? बघायला विसरू नका हे सगळं बिग बॉस मराठीमध्ये आणि “बिग बॉस मराठी - Weekend चा डाव रविवारी रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Bigg Boss Marathi Sharad Upadhye 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement