News
Typography

दोन मालिका एकत्र आणून त्यांचा महासंगम करण्याची स्टार प्रवाहची संकल्पना प्रेक्षकांना प्रचंड आवडली. 'शतदा प्रेम करावे' आणि 'नकळत सारे घडले' या दोन मालिकांच्या महासंगमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' या लोकप्रिय मालिकांचा महासंगम येत्या शुक्रवारी, २७ एप्रिलला पहायला मिळणार आहे. 'गोठ' आणि 'छोटी मालकीण' या दोन मालिकांच्या कथानकातला ट्विस्ट प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवेल.

छोटी मालकीण या मालिकेत सुरेशच्या शोधात असलेले त्याचे आई-वडील गोठ मालिकतेल्या म्हापसेकरांकडे येतात. बयो आजीला भेटतात. राधा त्यांना तिथं पाहते. गोठमधली राधा आणि छोटी मालकीणची रेवती या दूरच्या मावसबहिणी आहेत. त्यामुळे राधा नीलाच्या चोरओटीच्या कार्यक्रमासाठी रेवतीला आमंत्रण देते आणि त्याचवेळी सुरेशच्या आई-वडिलांना पाहिल्याचं सांगते. रेवतीलाही सुरेशला भेटण्याची इच्छा असते. नीलाला भेटण्याचा प्रयत्न करणारा निखिल आणि श्रीधर यांच्यात मारामारी होते. श्रीधर आणि रेवती नीलाच्या चोरओटीच्या कार्यक्रमासाठी म्हापसेकरांच्या घरी आल्यानंतर तिथं काय नाट्य घडतं, हे महासंगममध्ये पहायला मिळणार आहे.

गोठ आणि छोटी मालकीण या दोन मालिका एकत्र आणून त्याची एक कथा गुंफणं ही अनोखी कल्पना आहे. या मालिकांच्या महासंगममध्ये काय घडणार हे न चुकता पहा शुक्रवारी, २७ एप्रिलला रोजी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Revati and Radha in Chhoti Malkeen Goth Mahasangam 02

Revati and Radha in Chhoti Malkeen Goth Mahasangam 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement