News
Typography

झी युवावरील लोकप्रिय मालिका गुलमोहरमधील हृदयस्पर्शी कथांनी प्रेक्षांची मने जिंकली आहेत. येत्या आगामी भागात गुलमोहर "उधारी" नावाची कथा प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. ही कथा उधारीवर गरज भागविणाऱ्या सदा आणि त्याची बायको मनीषा या दोघांची आहे. मीनल बाळ यात मनिषाची भूमिका करत आहे तर सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता सागर कारंडे हा सदाची व्यक्तिरेखा साकारत आहे.

कोणीतरी म्हटलेच आहे की अंथरूण पाहून पाय पसरावेत ते अगदी खरे आहे आणि ही म्हण उधारी या कथेचा पाया आहे. या कथेतील सदा मनाने खूप चांगला आहे पण त्याला लोकांकडून उधारी घ्यायची वाईट सवय आहे. अर्थात त्याचा त्यामागील उद्देश उधारी देणाऱ्याला लुटण्याचा नसून त्याची ती मानसिकता आहे. मात्र त्याच्या या सवयीचा परिणाम त्याची बायको मनीषा हिच्यावर होतो. तिला चारचौघात स्वाभिमानाने फिरता येत नाही.

उधार घेण्याच्या या सवय़ी पासून मनीषा सदाला कशी बाहेर काढते? त्यात तिला यश मिळते का? अशा वेगळ्याच मानसिकतेत अडकलेल्या सदाला मनीषा कशा प्रकारे बाहेर काढेल ? सदा त्याच्या सवयीवर मात करेल का?
हे जाणण्यासाठी पहात रहा गुलमोहर प्रत्येक सोमवार ते मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!

Gulmohar Zee Yuva Udhari 02

Gulmohar Zee Yuva Udhari 03

Gulmohar Zee Yuva Udhari 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement