News
Typography

अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलेल्या झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने नुकतंच ५०० यशस्वी भागांचा टप्पा गाठला. या मालिकेतील अंजली आणि राणा नव्हेच तर बरकत, नंदिता वहिनी, चंदे हि सगळी पात्र महाराष्ट्राच्या घरा घरात पोहोचली आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजनच नाही केलं तर कुस्ती या खेळाचं महत्व देखील दर्शवलं. अंजली आणि राणा यांची हृदयस्पर्शी प्रेमकथा, कठीण परिस्थितीत न डगमगता, एकमेकांच्या साथीने प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची दोघांची वृत्ती प्रेक्षकांना भावली. लोप्रियतेचं शिखर गाठलेल्या या मलिकने प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्याने मैलाचा दगड पार पडला आहे.

५०० भाग पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना अंजली म्हणजेच अभिनेत्री अक्षय देवधर म्हणाली, "मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छिते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असंच राहू दे. मला यामालिकेचा एक महत्वाचा हिस्सा बनवल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण 'तुझ्यात जीव रंगला'च्या टीमची आभारी आहे."

राणादा म्हणजेच हार्दिक जोशी म्हणाला, "मला खूप आनंद होतोय की 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. यात संपूर्ण टीमच श्रेय आहे. प्रेक्षकांचं आमच्यावरच प्रेम दिवसागणिक वाढत जावं अशी मी प्रार्थना करतो. हा एक सुंदर प्रवास आहे आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू."

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 01

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 02

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 03

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 04

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 05

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 06

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 07

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 08

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 09

Tujhyat Jeev Rangala 500 Episodes 10

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News