News
Typography

आपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कसं रंजक होतं, हे आता पहावं लागेल.

आक्का आत्या म्हणजे विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. जुन्या पिढीची असूनही नव्या काळाचं तिला चांगलंच भान आहे. ती व्हॉट्सअॅप-फेसबुकही वापरते. चित्रपटांची आवड असल्यानं मध्येच फिल्मीही होते. तिचा स्वभाव मात्र जरा चमत्कारिक आहे. चेष्टा करताना अचानक चिडते, चिडलेली असताना हसू लागते. तिच्या या विचित्र स्वभावामुळे ती खाष्ट वाटते. ही आक्का आत्या काही ना काही करून रेवतीला त्रास देण्याचा प्रयत्न करते. श्रीधरला रेवतीबद्दल काहीबाही सांगून चिथवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आक्का आत्याच्या कारस्थानांना श्रीधर बधत नाही; उलट तो रेवतीलाच पाठिंबा देतो.

श्रीधर आणि छोटी मालकीण रेवती यांच्या नात्यात आक्का आत्या मीठाचा खडा टाकू पाहत आहे. आक्का आत्याच्या एंट्रीनं कथानक अधिक रंजक होणार आहे. आक्का आत्याची कारस्थानं श्रीधर कशी उधळून लावणार हे पाहणं उत्सुकतेचं असेल. त्यामुळे न चुकता पहा छोटी मालकीण सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर !

Varsha Dandle Enter Chhoti Malkeen 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)