News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस हा खेळ रंगला होता परंतु घरामधील सदस्य हा खेळ समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे बिग बॉसने त्यांना घरामधून बेघर केले. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद ठेवण्यात आली आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे असे सांगण्यात आले... तसेच दिवसाअंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस यांनी सूचित केले.

या दरम्यान घरातील काही भागांवर ताबा मिळविण्यासाठी सदस्यांना काही गोष्टींचा त्याग करावा लागेल असे बिग बॉसने सांगितले. आस्ताद काळे याने स्वत:ला घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी नॉमिनेट केले असून, घरातल्यांनी किचनचा ताबा मिळविण्यासाठी घरात असलेल्या तांदुळाचा त्याग केला तर गार्डनचा ताबा मिळविण्यासाठी राजेश आणि रेशम अनिश्चित कालावधीसाठी त्यांच्या संपूर्ण सामानासहित गार्डन मध्ये रहाण्यास तयार झाले. बिग बॉसच्या घरामधील या रंगत चालेल्या खेळामध्ये आज काय बघायला मिळणार आहे हे बघणे रंजक असणार आहे.

चोर पोलीस कार्यामध्ये स्मिताच्या विचित्र वागणुकीचा घरातील काही सदस्यांना खूपच त्रास होतो आहे. स्मिता आणि मेघाच्या भांडणानंतर आज स्मिता, उषाजी आणि रेशम मध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. रेशम आणि उषाताई मधील वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे असे दिसून येत आहे. तर दुसरीकडे, मेघा रेशमवर ती दादागिरी करत असल्याचा आरोप करणार आहे. तिने असे का म्हंटले याचा खुलासा आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळेल. बिग बॉसने दिलेल्या कार्यामध्ये राजेशची टीम विजयी ठरली असून आता जुई आणि पुष्कर मध्ये कॅप्टनशीपसाठी चुरस रंगणार आहे. हे कार्य करत असताना सुशांत आणि पुष्कर मध्ये वाद झाला ? जुई कोणावर चिडली ? घराचा नवा कॅप्टन कोण होणार ?

हे सगळे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 19 Bigg Boss Marathi 01

Day 19 Bigg Boss Marathi 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)