News
Typography

गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या वेळी गुलमोहरमध्ये वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार आहे.

बरेचवेळा आई वडील हे आपल्या इच्छा आणि अपेक्षा नकळत का होईना आपल्या मुलांवर लादत असतात, पण त्याचा मुलांवर काय परिणाम होतोय याचा विचार सहसा कोणी करत नाही. आई वडील हे नेहमीच आपल्या मुलांचं हित बघतात. त्यांचे भविष्य आपल्यापेक्षा उज्वल व्हावे,आपण ज्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकलो नाही त्या आपल्या मुलांना मिळाव्या हीच त्यांची माफक अपेक्षा असते. मात्र त्यांच्या या अपेक्षांच्याओझ्याखाली मुलांची आवड, भविष्यात त्यांना पुढे जाऊन काय करायचे आहे याकडे मात्र त्यांचा थोडा कानाडोळा होतो आणि याचे कधी कधी गंभीर परिणाम हे नंतर समोर येतात.

अशीच परिस्थिती कामत आजोबांची देखील आहे. मुलाची आवड ही वेगळी आहे याची जाणीव कामत आजोबांना त्याच्या आकस्मिक निधनानंतर झाली. मुलाच्या अशा अचानक जाण्याने कामत आजोबांच्या आयुष्यात एकटेपण आणि रिकामीपण आलाय. आता संध्याकाळी राहिलेला वेळ कसा घालवायचा म्हणून त्यांनी स्वतःचा कॅफे चालवायचं ठरवलं. एक दिवस चिन्मय नावाचा तरुण येतो आणि त्याला बघून कामत आजोबा आश्चर्यचकित होतात. त्यांना त्याच्यात त्यांचा मुलगा भेटतो. चिन्मय देखील सेम टू सेम त्याच्या मुलासारखाच दिसतो, बोलतो आणि वागतो. पुन्हा एकदा कामत आजोबांच्या समोर चिन्मयच्या रुपात त्याचा मुलगा उभा राहतो.

या समांतर गोष्टीचा कसा करतील कामत आजोबा सामना? कामत आजोबांकडून पूर्वी झलेल्या चुकांची पुनरावृत्ती होईल कि ते झालेल्या चुकांचं प्रायश्चित्त घेतील? हे जाणण्यासाठी, पहायला विसरु नका गुलमोहर प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!

Gulmohar Zee Yuva Samantar 02

Gulmohar Zee Yuva Samantar 03

Gulmohar Zee Yuva Samantar 04

Gulmohar Zee Yuva Samantar 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)