News
Typography

'सैराट'हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची - परशावर प्रेक्षकांचं असणार प्रेम किंचितभर देखील कमी नाही झालं. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली पण एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचे किती योगदान आणि कष्ट असतात, त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रदर्शित होण्यापर्यंतच्याप्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण झी टॉकीज वाहिनी पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन अली आहे.

मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. सैराट या सुपरहिट चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झी टॉकीज त्यांच्या लाडक्या प्रेक्षांकासाठी 'सैराटच्या नावानं चांगभलं' हा कार्यक्रम सादर केला आहे. येत्या रविवारी प्रसारित होणाऱ्या 'सैराटच्या नावानं चांगभलं'च्या भागात प्रेक्षक सैराटच्या चित्रीकरणाच्या सुरुवात पाहू शकणार आहेत. ५ फेब्रुवारीला सैराटच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आणि त्यावेळी संपूर्ण टीमची काय मनस्थिती होती याचा उलगडा या भागात होणार आहे. तसेच आर्चीने बुलेट कशी चालवली, चित्रपटाच्या सुरुवातीला असलेला मनोरंजक क्रिकेट सिन, आत्ताच बया का? गाण्याचे चित्रीकरण, वर्गात चित्रित केलेले सीन्स आणि हे सर्व करताना पडद्यामागील कसरत प्रेक्षक या भागात पाहू शकणार आहेत.

तेव्हा पाहायला विसरू नका पडद्यामागचा सैराट येत्या रविवारी दुपारी १२ वाजता फक्त झी टॉकीज वर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News