News
Typography

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. याकार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात सुपरस्टार अंकुश चौधरीने डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर चार चांद लावले. या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहेत. हे दोघांच्या उपस्थितीत स्पर्धक त्यांच्या बालपणाला उजाळा देणार आहेत.

गणेश आचार्य सारखा डान्सचा गुरु डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर त्याची झलक दाखवणार आहे. खलिबली या गाण्यावर तो सर्व परीक्षकांसोबत थिरकणार आहे. स्टार परफॉर्मर सद्दाम बालमजुरीवर ऍक्ट सादर करणार आहे, त्याचा हा परफॉर्मन्स बघून शब्दहीन झालेले स्वप्नील आणि गणेश त्यांच्या बालपणीच्या काही आठवणी प्रेक्षकांसोबत शेअर करणार आहेत. सर्वांचा मूड हलका करण्यासाठी वायके ग्रुप छबिना हा वेगळा डान्स फॉर्म सादर करणारआहेत. त्यांचा हा परफॉर्मन्स पाहून स्वप्नील स्वतःला मंचावर जाण्यापासून आवरू नाही शकला. त्याने ढोल वाजवून संपूर्ण ग्रुपसोबत डान्स देखील केला. बॅकबेंचर्स आणि शाळेतील पहिलं प्रेम या गोड आठवणींना उजाळा देत गॅंग१३ ने झिंगाटवर नृत्य केलं. किंग ऑफ पॉपींग चेतन साळुंखेने आईचं तिच्या मुलांवरील प्रेम दर्शवणारा 'आई' या गाण्यावर एक खास ऍक्ट सादर केला. हे सर्व दमदार परफॉर्मन्सेस पाहून प्रेक्षकांना नक्कीच त्यांचं बालपण आठवेलआणि ते थोडे क्षण का होईना पण त्यांचं बालपण या भागांतून जगातील.

तर असे एका पेक्षा एक परफॉर्मन्सेस पाहायला विसरू नका ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ मध्ये बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर.

Dance Maharashtra Dance Ranangan Team 03

Dance Maharashtra Dance Ranangan Team 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News