News
Typography

गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी गुलमोहर एका आईची व्यथा आगामी 'आई' या कथेद्वारे सज्ज झाली आहे.

या कथेत शुभांगी सावरकर मीराची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि सई रानडे स्मिताची भूमिका साकारणार आहे. स्मिता आणि मीरा यांच्या जीवनात ही कथा समांतर चालत रहाते. त्या दोघी त्यांच्या मुलांच्या आई आहेत पण फरक फक्त एवढाच आहे की; स्मिता ही श्रीमंत सुसंस्कृत घरातील पत्नी आहे तर मीरा ही तिच्या घरात घरकाम करणारी बाई असून मुलांच्या जगण्यासाठी कमवत आहे.

प्रत्येक स्त्री हि आपल्या घरासाठी, मुलांसाठी, परिवारासाठी कायम झटत असते. त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक कामाच्या थरातून तिला जावे लागते, मग ते काम छोट्या प्रकारचे असो व उच्च प्रतीचे असो तिचा उद्देश आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारे परिस्थितीची झळ पोहचू नये. अशीच आपली मीरा आहे जी स्मिताच्या घरी घरकामासाठी आहे. आत्ता अशा दोन वेगळ्या स्तरात्यला स्त्रीया आणि त्यांच्यातील संघर्ष सांगणारी आई हि कथा.
स्मिता आणि मीरा त्यांच्या मुलांसाठी आदर्श बनण्यात यशस्वी होतील का?

पुढे काय होते हे पाहण्यासाठी, पहायला विसरु नका गुलमोहर, प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!

Gulmohar Zee Yuva Aai 02

Gulmohar Zee Yuva Aai 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement