News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल अनिल थत्ते यांना घराबाहेर जावे लागले. घराबाहेर पडल्यावर त्यांना एक विशेष अधिकार देण्यात आला ज्याद्वारे ते घरामधील एका सदस्याला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमधून वाचवू शकतील. अनिल थत्ते यांनी भूषण कडूला वाचविले असून, आता घरामधील बाकीचे सदस्य कोणाला नॉमिनेट करणार ? कोण घराबाहेर पडणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

राजेश शृंगारपुरे गेले बरेच दिवस सिक्रेट रूम मध्ये एकटा रहात होता. परंतु, काल त्याला अश्रू अनावर झाले आणि त्यांनी बिग बॉसला विनंती केली कि मला परत बिग बॉसच्या घरामध्ये जाऊ द्या. आज राजेश बिग बॉस मराठीच्या घरामध्ये परतणार असून रेशम, आस्ताद, सुशांत, जुई सगळ्यांच खूप आनंद झाल्याचे दिसून येणार आहे. रेशम आणि राजेश हे दोघीही मागील आठवड्यामध्ये डेंजर झोनमध्ये होते. रेशम टिपणीस घरामध्ये परतली पण, राजेश याला अज्ञात वासामध्ये ठेवण्यात आले होते परंतु घरच्यांसाठी मात्र तो एलिमनेट झालेला होता. आज राजेश याला बिग बॉस त्याचा अज्ञात वासाचा कालावधी संपला असे घोषित करून परत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवणार आहेत. राजेशच्या येण्याने आता घरामध्ये तसेच सदस्यांमध्ये काय बदल बघायला मिळतील हे बघण्यासारखे असणार आहे. राजेश घरी परतल्यावर, “मी फक्त तुझ्यासाठी या घरामध्ये आलो” असे राजेशने रेशमला बोलून दाखवले आहे.

आज नॉमिनेशन प्रक्रिया सुरु होणार असून, या नॉमिनेशनमध्ये भूषण कडू सेफ असून बाकीच्या सदस्यांपैकी कोण कोणाला नॉमिनेट करेल ? कोण या आठवड्यामध्ये घराबाहेर होईल ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 29 Bigg Boss Marathi 02

Day 29 Bigg Boss Marathi 03

Day 29 Bigg Boss Marathi 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement