News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून आले. काल रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉस यांनी सरप्राईझ दिले. राजेश घरी परतला. रेशम राजेशला घरी परतल्याचे बघून खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला. तसेच राजेश सिक्रेट रूम मध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत ? हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडली ज्यामध्ये जुई, राजेश, सई, ऋतुजा आणि रेशम घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले. आता आज कोण कोणाला नॉमिनेट करेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच बिग बॉस आज घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. तेंव्हा आज घरातील सदस्य हा टास्क कसा पूर्ण करतील ? कोणाची भांडण होतील ? कोण संयम राखून खेळेल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “थेंबे थेंबे तळे साचे” हे साप्ताहिक कार्य. पाण्याचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी घरातील सगळ्या नळांचे पाणी बंद करण्यात येणार आहे. या कार्या अंतर्गत घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या टीम्सना दोन रिकाम्या टाक्या देण्यात येणार आहेत. घरातील कुठल्याही कार्यास पाणी हवे असल्यास सदस्यांना या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि दैनंदिन कार्यासाठी पाणी लागल्यास याच टाकीतील पाणी वापरणे अनिवार्य असणार आहे. जेंव्हा पाणी सोडण्यात येईल तेंव्हा टीमच्या टाकीत पाणी भरायचे आहे, आणि त्यासाठी टीम्सना बादल्या देण्यात येणार आहेत. नळाला पाणी थोड्याच वेळासाठी सोडण्यात येणार असून टीमने त्या कालावधीतच जास्ती जास्त पाणी भरणे अपेक्षित आहे.

तेंव्हा या टास्क मध्ये कोणीती टीम बाजी मारणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 30 Bigg Boss Marathi 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement