News
Typography

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धकांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर या आठवड्यात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहे. तसेच सोनाली कुलकर्णी या मंचावर काही मनोरंजक गोष्टींचा खुलासा करणार आहे.

सोनालीने जेव्हा तिच्या मराठी चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा तिच्या पहिल्या सिनेमातील तिचा हिरो हा सिद्धार्थ जाधव होता. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात सिद्धार्थ आणि सोनालीने १० वर्षांपूर्वी एकत्र काम केले होते. सोनालीची पहिली फिल्म ही तिच्यासाठी तिचं पहिलं प्रेम आहे आणि या नंतर तिची भेट सिद्धार्थशी डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर झाली. सोनाली आणि सिद्धार्थला एकमेकांना भेटून खूप आनंद झाला.

सोनाली आणि सिद्धार्थची ऑन स्टेज मजा मस्ती पाहण्यासाठी बघायला विसरू नका डान्स महाराष्ट्र डान्स बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवावर!!

Dance Maharashtra Dance Sonalee Kulkarni 02

Dance Maharashtra Dance Sonalee Kulkarni 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement