News
Typography

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. अक्षयला घरातून काढणे, अक्षय आणि कियाराचे एकत्र राहाणे, अमृताचे घाडगे सदन मध्ये परतणे, आणि वसुधाचे कटकारस्थान. पण, आता प्रेक्षकांना काही वेगळे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. कारण, घाडगे सदनमध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार म्हणजेच सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी येणार आहेत.

त्यांच्या आगामी रणांगण चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सचिनजी आणि स्वप्नील जोशी दोघांनीही घाडगे & सून मालिकेमध्ये हजेरी लावली. घरामधील सदस्य म्हणजेच माई, भाग्यश्री, अमृता दोघांनाही बघून खुश झाले. या दरम्यान त्यांनी चित्रपटाविषयी त्यांच्या भुमिकेविषयी देखील घाडगे परिवाराला सांगितले. या खास भाग प्रेक्षकांना बघयला मिळणार आहे घाडगे & सूनच्या आजच्या भागामध्ये रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

घाडगे सदन मध्ये आल्यानंतर सचिन पिळगावकर यांनी अण्णा आणि घाडगे परिवाराशी असलेले जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. परिवारातील सदस्यांच्याशी गप्पा देखील मारल्या.

तेंव्हा बघायला विसरू नका 'घाडगे & सून'चा आजचा भाग रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Swwapnil Sachin in Ghadge and Sunn 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement