News
Typography

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “व्यक्त व्हा मुक्त व्हा” हे कार्य. घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रचंड राग खदखदतो आहे असे बिग बॉस यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. त्यामुळेच या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांना बिग बॉस त्यांच्या मनातील राग व्यक्त करण्याची संधी देणार आहेत. गार्डन एरियामध्ये पंचिंग बॅग आणि बॉक्सिंग ग्लोव्हस तसेच सर्व सदस्यांचे फोटोज ठेवण्यात येणार आहेत. त्या पंचिंग बॅगवर सदस्यांचे फोटोज लावून आपल्या मनातील राग बाहेर काढायचा आहे आणि कटू भावनांना मोकळी वाट द्यायची आहे. परंतु हा राग फक्त त्या बॅगला मारून नव्हे तर मनात साठलेल्या भावना आणि राग बोलून देखील दाखवायचा आहे.

या टास्क दरम्यान सर्व सदस्यांना तो राग व्यक्त करण्याची संधी बिग बॉस देणार आहेत. जुईला जेंव्हा संधी मिळाणार आहे तेंव्हा ती सई, मेघा आणि ऋतुजावर आपला राग व्यक्त करणार आहे. तर पुष्करने जुई, स्मिता, राजेश, रेशम, भूषण म्हणजेच त्यांच्या संपूर्ण ग्रुपवर राग व्यक्त करणार आहे. ज्यामध्ये त्याने या संपूर्ण ग्रुपमधील सदस्य स्वत:लाच बिग बॉस समजत आहेत असे सांगणार आहे. त्यानंतर मेघा देखील याच ग्रुपवर तिची नाराजी व्यक्त करताना दिसणार आहे. ज्यामध्ये ती रेशम आणि राजेश आवडत नाही असे म्हणणार असून यामधील कोणामध्येच मोठेपण नाही, सगळे ढोंगी आहेत आणि चांगलेपणाचे नाटक करतात असे म्हणणार आहे.

रेशमने सई, मेघा आणि उषाजी यांवर राग व्यक्त करणारा असून सई आणि तिची स्पर्धाच नाही असे सांगणार आहे. तसेच मेघा आणि उषाजींवर देखील बरीच नाराजगी व्यक्त करणार आहे. ऋतुजा या टास्कमध्ये आपल्या मनामध्ये असणारा राग आणि बऱ्याच कटू भावना मोकळी करताना दिसणार आहे. तिने जुईला नुसता गोड चेहरा आहे तर रेशम आणि भूषण बद्दल देखील राग व्यक्त केला. राजेश, सुशांत, स्मिता, भूषण, उषाजी यांच्या मनामध्ये काय आहे हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळेलच.

हे सगळे जाणून घेण्यासाठी बघायला विसरु नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 31 Bigg Boss Marathi 02

Day 31 Bigg Boss Marathi 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement