News
Typography

संगीत अर्थात सूर...लय आणि ताल यांचा सुरेख संगम. जेव्हा श्रवणीय स्वरांना मधूर आवाजाचा स्पर्श होतो आणि तालाची जोड मिळते तेव्हा ऐकणाऱ्याचे पाय आपसूकच ठेका धरतात. मान नकळत डोलायला लागते. पापण्या मिटूनते स्वर कानात साठवण्याचा ध्यास लागतो. संगीताची ही किमया आपल्या संस्कृतीचा गाभा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संगीत व्यापून राहिले आहे. किंबहुना माणसाच्या आयुष्यातील प्रत्येक भावना तो संगीताच्या सोबतीने अनुभवतो...जगतो. एखाद्या गाण्याचे स्वर, शब्द, त्यातील अर्थ जीवनाच्या कित्येक वळणावर अनुभूतींची शिदोरी देतो.

स्वरांवर प्रभुत्व मिळवणारा पट्टीचा गायक स्वर आराधना करण्यासाठी आयुष्य वेचत असतो. चाली रचणाऱ्यांच्यामनात क्षणोक्षणी स्वरांचे तरंग उमटत असतात. कठोर रियाजाने वादकांच्या हातात तालाची जादू येत असते. टीपेला पोहोचणारा आवाज, मनात रूंजी घालणारे संगीत आणि कधी थांबूच नये असा ताल ऐकला की आपोआप ओठावरशब्द येतात...'संगीत सम्राट' झी युवावर या गाजलेल्या कार्यक्रमाचे दुसरे पर्व सुरु होत आहे . संगीत सम्राट पर्व २ च्या ऑडिशन नाशिक, नागपूर, पुणे, या शहरात झाली आणि आता ऑडिशन मुंबई या शहरात होणार आहेत. २० मे ला संगीत सम्राट पर्व २ चे ऑडिशन मुंबई शहरात सकाळी ८ वाजता पटूक टेक्निकल हायस्कुल आणि जुनिअर कॉलेज, ब्रिज, १०० नेहरू रोड, रुसतोम्बा पटूक मार्ग, वाकोला, सांताक्रुज पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०००५५.

महाराष्ट्रातील अनेक होतकरू गायक आणि संगीतकार त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक संधीच सोने करण्याची वाट पाहत असतात. मात्र अशा संधी फार कमी येतात. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी संगीत सम्राट या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वालाअतिशय उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील संगीत आणि गायकी क्षेत्रातील कलाकारांना एक वेगळा दर्जा मिळाला. गाण्यांवर आधारित रिअॅलिटी शोच्या या गर्दीत 'संगीत सम्राट' या आगळ्या वेगळ्या म्युजिकरिऍलिटी कार्यक्रमाने स्वतःची एक वेगळी ओळख बनवली आहे. नव्या स्वरूपातील 'संगीत सम्राट पर्व २' एका वेगळ्या स्तरावर सुरु होणार आहे . या पर्वामध्ये संगीतमय माणसाचा शोध आणि माणसातील संगीताचा शोध घेतलाजाणार आहे पण एका नव्या आणि वेगळ्या पद्धतीने. या कार्यक्रमात केवळ गाणे गायचे नाही तर संगीत सम्राट हा कार्यक्रम अशा कलाकारांसाठी आहे जे कोणत्याही वाद्यापासून वस्तूपासून सुमधुर संगीत बनवू शकतील. तमाममराठी प्रेक्षकांना स्वतःत असलेले संगीतगुण जगासमोर आणण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.

'संगीत सम्राट पर्व २'मध्ये सहभागी होण्यासाठी ऑडिशन्सला लवकरच सुरुवात होणार असून कोणत्याही वयोगटातले स्पर्धक यात सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेला जसे वयाचे बंधन नाही तसेच विशिष्ट संगीतप्रकाराचे बंधननसेल. यात तुम्ही एकटे, जोडीदारासोबत किंवा पूर्ण ग्रुपसोबतही सहभागी होऊ शकता. गायन, वाद्य वाजवणे तसेच बँड परफॉर्मन्स सादर करणे हे या शोचे वैशिष्ट्य असेल. यात सहभागी होण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याने उत्तमप्रतिसाद मिळेल अशी आम्हाला आशा आहे.

तर मग तयार रहा महाराष्ट्राच्या लाडक्या भव्य म्युजिक रिऍलिटी शोसाठी, संगीत सम्राट पर्व २ ऑडिशन पत्ता: वेळ सकाळी ७ वाजल्यापासून प्रवेशिका ऑडिशनच्या पत्त्यावर ऑडिशन च्या दिवशीच मिळतील.

Sangeet Samrat Auditions

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement