News
Typography

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेत रेवती आणि श्रीधर यांच्यात आता हळवं नातं तयार होत आहे. शेतीच्या कामासाठीचा स्प्रे घेण्यासाठी श्रीधरची धडपड सुरू आहे. त्यासाठी तो पैसे उभे करत आहे. श्रीधरच्या मदतीसाठी आता रेवतीही पुढे सरसावली आहे. गावातली पाककला स्पर्धा जिंकून रेवती श्रीधरला मदत करणार का, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

स्प्रे घेण्यासाठी श्रीधरच्या कर्जाचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. त्यामुळे पैसे उभे करण्यासाठी त्यानं स्वतःची बाईक विकली. सुमननं दागिने विकून पैसे दिले आहेत. सगळेजण श्रीधरला मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मग रेवतीलाही वाटतं, की आपणही श्रीधरला मदत केली पाहिजे. अशातच गावातल्या सितारा महिला मंचातर्फे 'धमाल सासु-सुनेची, कमाल पाककलेची' ही स्पर्धा जाहीर होते. स्पर्धेच्या विजेत्याला एक लाखाचं पारितोषिक दिलं जाणार असतं. त्यात रेवती सहभागी होते. मात्र, त्या स्पर्धेत रेवतीची आई आणि अभिलाषाही सहभागी झालेल्या असतात. त्यामुळे आपल्या आईला हरवून रेवती ही स्पर्धा जिंकणार का, हे पहाणं रंजक ठरणार आहे.

पाककला स्पर्धेत रेवती जिंकणार का? श्रीधरला स्प्रे घेण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम जमा होणार का? या प्रश्नांची उत्तरं छोटी मालकीण या मालिकेतच मिळणार आहे. त्यासाठी न चुकता पहा ‘छोटी मालकीण’ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर

Chhoti Malkeen Cooking Competition 01

Chhoti Malkeen Cooking Competition 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement