News
Typography

चला हवा येऊ द्या च्या इतिहासात आजपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावली, आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती बॉलीवूड मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी मराठमोळी धकधक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांची.

माधुरी चला हवा येऊ द्या च्या मंचावर आली तो आपला पहिला वाहिला मराठी चित्रपट घेऊन ‘बकेट लिस्ट’. यावेळी चला हवा येऊ द्या टीम ने 'हम आपके हैं कौन' वर स्किट करून धमाल उडवून दिली. या कार्यक्रमासाठी करण जोहर हे देखील उपस्थित होते. ‘बकेट लिस्ट’ टीम सोबत माधुरी ने आपला वाढदिवस साजरा केला. करण जोहर यांना चला हवा येऊ द्या च्या सेटवरचा अनुभव विचारला असता ते म्हणाले. “माझ्या आगामी ‘धडक’ या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी मी या मंचावर परत येईन. या निमित्ताने गेली ४ वर्ष अविरत प्रेक्षकांना हसवणाऱ्या या टीम मध्ये अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.”

‘चला हवा येऊ द्या’ चा हा भाग तुम्हाला पाहता येणार आहे येत्या सोमवार आणि मंगळवारी २१ आणि २२ मे ला रात्री ९.३० वा. फक्त आपल्या 'झी मराठीवर'.

Promo Videos

Photos

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 01

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 02

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 03

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 04

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 05

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 06

Madhuri Dixit on Chala Hawa Yeu Dya 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement