Click To Book Tickets

News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जातो. तसंच या आठवड्यामध्ये देखील कोणा एकाला घराबाहेर जावं लागणार आहे. या आठवड्यामध्ये जुई गडकरी, राजेश शृंगारपुरे आणि रेशम टिपणीस हे डेंजर झोनमध्ये आले, आणि राजेशला घराबाहेर जावं लागलं. राजेश घराबाहेर पडल्याचे दु:ख सगळ्यांच झाले. रेशम, उषा नाडकर्णी, सुशांत, आस्ताद, जुई, भूषण खूप भावुक झाले. नेहेमीप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी राजेशला देखील मिळाली तेंव्हा राजेशने घरातील काही सदस्यांना तर काही सदस्यांनी त्याच्या जवळ त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोण नवा कॅप्टन बनेल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना दिला फुलांचा आणि काट्यांचा मान. स्मिताने उषाजींना गुलाबाचे फुल दिले, उषाजींनी स्मिताची बरीच तारीफ देखील केली, तर राजेशला काटे म्हणजे निवडुंगाचे झाड दिले. उषाजींनी मेघाला ती खूप बोलते म्हणून प्रेमाने काट्यांचा मान दिला, तर त्यांच्या लाडक्या पुष्करला मिळाला फुलांचा मान. तर भूषणने सुशांतला तर हर्षदाने रेशमला फुलाचा मान दिला. रेशमने आणि भूषणने मेघाला काट्यांचा मान दिला. सईने राजेशला काटे तर मेघाला गुलाबाचा मान दिला.

Click Here To Read : Is Rajesh- Resham's Vulgar Behaviour Responsible for his Eviction by Public Votes

एकदा अज्ञात वासामध्ये राहिल्यानंतर राजेश शृंगारपुरे या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडला. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Rajesh Shringarpure Evicted Bigg Boss Marathi 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement