News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल नॉमिनेशन प्रक्रियेसाठी ग्राम सभा भरली ज्यामध्ये घरामधील सदस्यांच्या जोड्या करण्यात आल्या. या दोन्ही सदस्यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये का रहावे तसेच दुसरा सदस्य घरामध्ये रहाण्यास कसा अयोग्य आहे हे पंचायतीमधील इतर सदस्यांना पटवून द्यायचे होते. जेंव्हा जोडी स्वत:ची कारणे देत असतील तेंव्हा इतर सदस्य पंच म्हणून भूमिका पार पाडताना दिसले. जोड्यांची कारणे ऐकल्यानंतर सर्व सदस्यांनी कोणा एकाला नॉमिनेट तर दुसऱ्याला सुरक्षित करायचे होते. या टास्कमध्ये सई आणि स्मिता, रेशम आणि मेघा, जुई आणि उषा ताई, भूषण आणि आस्ताद, सुशांत आणि पुष्कर अशा जोड्या करण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये सई, उषा नाडकर्णी, आस्ताद आणि सुशांत हे घरातून बाहेर घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले.

आता आज रेशम आणि मेघा मध्ये कोण नॉमिनेट होणार हे बघणे रंजक असणार आहे. काल प्रेक्षकांसाठी ऋतुजाचे अचानक घराबाहेर जाणे जरा आश्चर्यकारक होते. पंरतु बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांनुसार कुठलाही सदस्य वैद्यकीय कारणास्तव घर सोडून जाऊ शकतो. एका टास्कदरम्यान ऋतुजाला दुखापत झाल्यामुळे तिला काल बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. तसेच आज देखील ही प्रक्रिया होणार असून बिग बॉस घरातील सदस्यांना अजून एक टास्क देणार आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “मर्डर मिस्ट्री” हे साप्ताहिक कार्य !

आजवर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पार पडलेल्या टास्कमध्ये सदस्यांनी शक्ती आणि युक्तीचा चलाखीने वापर करायचा असा आदेश होता. असे सांगूनही घरामध्ये युक्तीपेक्षा शक्तीचाचं वापर जास्त झाला. परंतु आता वेळ आली आहे, खऱ्या अर्थाने सदस्यांच्या युक्तीची शक्ती तपासण्याची. बिग बॉस सदस्यांवर आजच्या आठवड्यातील साप्ताहिक कार्य सोपवणार आहेत. या कार्याचे नावं आहे “मर्डर मिस्ट्री”. बिग बॉस मराठीच्या या रहिवाशी संघामध्ये काही खून होणार आहेत, परंतु हे खून शारीरिक नसून सांकेतिक असतील. या कार्यामध्ये कोणीतरी एक खुनी असेल तर कोणी एक गुप्तहेर असेल आणि काही सामान्य नागरिक. या प्रकारचा अनोखा टास्क पहिल्यांदाच बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे. हे होतं असतानाच आस्तादने हर्षदा, जुई, मेघा यांना एक चिठ्ठी घरातून आल्याचे सांगितले तसेच फोन आल्याचे देखील सांगितले ज्यामध्ये त्याच्या जवळच्या व्यक्तीचे लग्न ठरणार असून त्याला वाटल्यास अशा प्रसंगी तो घर सोडून जाऊ शकतो आणि त्याला चोवीस तासांचा अवधी देखील देण्यात आला आहे असे तो त्यांना सांगणार आहे. आता नक्की काय झाले आहे ? हे सत्य आहे कि, यात कुठलं गुपित दडलेले आहे ? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना कळणारच आहे.

तेंव्हा आज रेशम आणि मेघामध्ये कोण नॉमिनेट होणार? मर्डर मिस्ट्री या टास्क मध्ये काय होणार ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 37 Bigg Boss Marathi 01

Day 37 Bigg Boss Marathi 02

2 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 2.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement