News
Typography

टीआरपीचे उच्चांक गाठलेल्या झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवाती पासूनच पसंती दर्शवली. राधिका, गॅरी, शनाया आणि मालिकेतील इतर पात्रं देखील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. काही दिवसांपूर्वी मालिकेत राधिका आणि गुरुनाथ यांचा जुना मित्र सौमित्रची झालेली एंट्री देखील रंजक होती. या व्यक्तिरेखेला देखील प्रेक्षकांनी अखंड पाठिंबा दिला.

सध्या मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की गुरु शनायासाठी त्याच्या आई वडिलांचा अपमान करतो, शनाया त्याला यात दुजोरा देत असताना राधिका तिच्या श्रीमुखात भडकावते आणि गुरुनाथला देखील धमकावते. घडलेल्या प्रकारामुळे वातावरण खूपच तणावाचं झालंय. झालेला अपमान सहन न झाल्यामुळे आई बाबा नागपूरला जाण्याचा निर्णय घेतात. सौमित्र त्यांना आग्रह करून थांबवतो. घडलेल्या सर्व प्रकारामुळे सौमित्र आता शनाया आणि गुरूला कायमच वेगळं करण्याचा ठाम निर्णय करतो त्यामुळे तो राधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे.

आता त्यासाठी सौमित्र एक वेगळीच शक्कल लढवतो. शनायाच गुरुवर नाही तर गुरूच्या पैश्यांवर खूप प्रेम आहे हे सौमित्राला कळून चुकलंय त्यामुळे सौमित्र त्याच पैशाच्या जोरावर शनायाला इंप्रेस करण्याच्या प्रयत्न करतो. सौमित्र शनायाला आपल्या श्रीमंत असण्याचा पुरावे दाखवतो. शनायाला इंप्रेस करण्यासाठी सौमित्र तिला आवडण्याऱ्या सर्व गोष्टी करताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर तो तिला डिनर साठी पण विचारतो. आता शनायावर त्याची भुरळ पडेल का? शनाया गुरूला सोडून सौमित्रकडे जाईल का? हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 01

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 02

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 03

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 04

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 05

Saumitra Empress Shanaya Majhya Navryachi Bayko 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement