News
Typography

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरू झाला आहे. रमजानच्या काळात दिवसभर रोजा ठेवल्यानंतर (उपवास) संध्याकाळी खाऊन रोजा सोडला जातो. त्याला इफ्तार असं म्हणतात. स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका शतदा प्रेम करावेच्या प्रॉडक्शन टीममधील काही सहकारी रोजा ठेवत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी सेटवर नुकतीच इफ्तारची मेजवानी करण्यात आली.

मालिकेतील कलाकार अभिजित साटम, ज्ञानदा रामतीर्थकर, प्रिया मराठे, अंगद म्हसकर यांच्यासह मालिकेची टीम इफ्तार पार्टीला आवर्जून उपस्थित होती. खजूर, फळे, समोसे अशा अनेक खाद्य पदार्थांची या पार्टीमध्ये रेलचेल होती. संध्याकाळी सगळ्या टीमनं एकत्र येऊन या पदार्थांचा आस्वाद घेतला आणि रमजानच्या शुभेच्छाही दिल्या. कौटुंबिक वातावरण हे स्टार प्रवाहच्या मालिकांच्या सेटवरचं वैशिष्ट्य आहे. या इफ्तार मेजवानीच्या निमित्तानं त्याचा पुन्हा एकदा अनुभव आला.

Shatada Prem Karave On Set Iftar Party 01

Shatada Prem Karave On Set Iftar Party 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement