News
Typography

'चला हवा येऊ द्या'' च्या इतिहासात आजपर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी उपस्थिती लावत, मराठी भाषा बोलून रसिकांचे तुफान मनोरंजन केले. आमिर, शाहरुख, सलमान नंतर प्रतीक्षा होती ती फिट अँड फाईन हिरो 'सुनील शेट्टी' मंचावर आला तो आपल्या मराठी चित्रपटाच्या प्रमोशन साठी. 'अ.ब.क.' या मराठी चित्रपटात प्रेक्षक सुनील शेट्टीला मोठ्या पडद्यावर पाहू शकणार आहेत. यावेळी चला हवा येऊ द्या टीम ने 'धडकन' या चित्रपटावर स्किट करून धमाल उडवून दिली. या कार्यक्रमासाठी संगीतकार साजिद अली तसेच अमृता फडणवीस हे प्रमुख अतिथी देखील उपस्थित होते.

नुकतेच या मंचावर याआधी धकधक गर्ल माधुरी तसेच सोनम कपूर, कंगणा राणौत, वरून धवन, श्रीदेवी यासारख्या अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावत त्यांचा मराठमोळा अंदाजही रसिकांना पाहायला मिळाला. बॉलिवूड सेलिब्रेटींना मराठी भाषाही बोलता येत नसली तरीही या भाषेतला गोडवा समजून स्वत:ही खूप मजा मस्ती करताना दिसले. त्यामुळे बी-टाऊनची मंडळी या मराठमोळ्या अंदाजाच्या प्रेमात पडतायत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. पहिल्यांदाच सुनील शेट्टीने एखाद्या मराठी कार्यक्रमात हजेरी लावत थुकरटवाडीत फुल ऑन धमाल केली. विशेष म्हणजे कुशल बद्रिकेने सुनील शेट्टीचा कमल बेअरिंग पकडून सर्वाना पोट धरून हसायला भाग पाडलं.

‘चला हवा येऊ द्या’ चा हा भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे येत्या सोमवार आणि मंगळवारी ४ आणि ५ जून ला रात्री ९.३० वा. फक्त आपल्या 'झी मराठीवर'.

Sunil Shetty Promote Aa Bb Kk on Chala Hawa Yeu Dya 03

Sunil Shetty Promote Aa Bb Kk on Chala Hawa Yeu Dya 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement