News
Typography

विनोद, आजच्या काळाचा एक परवलीचा शब्द. हा विनोद आपल्याला अनेक पातळय़ांवर भेटत असतो. झी मराठी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या दर्जेदार कार्यक्रमामधून सकस विनोद जगभरातील मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आज अनेक वर्ष या कार्यक्रमाचा ताजेपणा कायम आहे. या कार्यक्रमात सादर होणारी विविध विनोदी स्कीट्स व त्यात सहभागी होणा-या निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या कलारांनी या कार्यक्रमाचा दर्जा कायम ठेवलेला दिसतो. त्यासाठी हे विनोदवीर करत असलेली मेहनतही त्यात दिसून येते.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टी पुरती मर्यादित राहिली नाहीये. आजवर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना हक्काचं व्यासपीठ देऊन त्यांच्या प्रसिद्धीची हवा घरोघरी निर्माण करण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला आहे. आगामी भागात झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका म्हणजेच माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका आणि शनाया म्हणजेच अनिता दाते आणि रसिका सुनील तसेच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पाठक बाई आणि नंदिता म्हणजेच अक्षया देवधर आणि धनश्री काडगावकर यांनी मंचावर हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत ‘चला हवा येऊ द्या’च्या विनोदवीरांनी हास्य कल्लोळ केला. या सर्व नायिकांचे विनोदवीरांनी खास विनोदी स्वागत गीत गाऊन स्वागत केलं. तसेच निलेश साबळे यांनी सर्व नायिकांसोबत काही मजेदार गेम्स देखील खेळले. सर्व नायिका भाऊ कदम सोबत रोमान्स करताना दिसणार आहेत आणि त्यामुळे प्रेक्षक नक्कीच हसून हसून लोटपोट होतील.

प्रेक्षकांच्या आवडत्या नायिका एका वेगळ्या अंदाजात आणि विनोदवीरांसोबत धमाल मस्ती करताना पाहायला विसरू नका ११ आणि १२ जून रोजी चला हवा येऊ द्या मध्ये रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठी वर!!

Zee Marathi Actresses on Chala Hawa Yeu Dya 02

Zee Marathi Actresses on Chala Hawa Yeu Dya 03

Zee Marathi Actresses on Chala Hawa Yeu Dya 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News