News
Typography

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळाले. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत गेली आणि परीक्षकांनी तावून सुलाखून महाराष्ट्राला ५ उत्तम डान्सर्स दिले. ओम डान्स ग्रुप, चेतन साळूंखे, वाय ३ डान्सहॉलीक्स, सद्दाम शेख आणि गॅंग १३ हे ५ स्पर्धक महाअंतिम सोहळ्यात एकमेकांशी भिडणार आहेत.

१० जून रोजी होणाऱ्या डान्स महाराष्ट्र डान्सच्या ग्रँड फिनाले मध्ये हे ५ ही स्पर्धक मंच गाजवणार आहेत. सुरुवातीपासून प्रेक्षकांची दाद मिळवणारा सद्दाम महाअंतिम सोहळ्यात कुर्बान हुआ आणि टिकटिक वाजते या लोकप्रिय गाण्यावर फ्रीस्टाईल डान्स सादर करणार आहे. प्रेक्षकांचा आवडता ओम डान्स ग्रुप चांद मातला आणि जीव रंगला या गाण्यांवर इंडियन कॉन्टेम्पररी नृत्य सादर करणार आहे. किंग ऑफ पॉपिंग चेतन साळुंखे तुझ्या प्रीतीचा आणि डॉल्बीवाल्या या गाण्यांवर त्याची पॉपिंगची जादू दाखवणार आहे.

या डान्स महाराष्ट्र डान्सच्या आत्ता पर्यंतच्या प्रवासाचे अविभाज्य भाग असलेले कार्यक्रमाचे परीक्षक हे देखील या मंचावर थिरकणार आहेत. एनर्जीचा वोलकॅनो अभिनेता सिद्धार्थ जाधव हुप्प हुय्या, फाफेआणि खलिबली या गाण्यावर ठेका धरणार आहे तर ग्रेसफुल कोरिओग्राफर फुलवा खामकर देखील इंडियन कॉन्टेम्पररी तसेच लावणी प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. मनोरंजनाने परिपूर्ण असलेलाहा महाअंतिम सोहळ्यात झी युवावरील प्रेक्षकांच्या लाडक्या आणि आवडत्या नायिका सुरुची अडारकर, ऋता दुर्गुळे, श्रुती अत्रे, अश्विनी कासार आणि कौमुदी वालोलकर या स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी झाल्यात. तसेच त्यांनी देखील काही लोकप्रिय गाण्यांवर ताल धरला. त्याचबरोबर डान्स महाराष्ट्र डान्सच्या फिनाले पर्यंत न पोहोचू शकलेले स्पर्धक देखील या मंचावर त्यांची कला सादर करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत

तेव्हा पाहायला विसरू नका 'डान्स महाराष्ट्र डान्स' चा ग्रँड फिनाले रविवार, १० जून रोजी सायंकाळी ७ वाजता फक्त झी युवा वर.

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 01

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 02

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 03

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 04

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 05

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 06

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 07

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 08

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 09

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 10

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 11

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 12

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 13

Dance Maharashtra Dance Maha Anteem Sohala Final 14

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement