News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये काल रंगला WEEKNED चा डाव. या मध्ये महेश मांजरेकर यांनी सदस्यांना मागील आठवड्यामध्ये दिलेल्या कार्याला पूर्ण करण्यास सांगितले. ज्यामध्ये पुष्कर आणि रेशमच्या टीमने नाटक सादर केले ज्यामध्ये पुष्करच्या टीमचे नाटक महेश मांजरेकर यांना आवडले. महेश मांजरेकर यांनी रेशम, आऊ आणि भूषणला उत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री तर नंदकिशोर आणि पुष्करला उत्तेजनार्थ बक्षीस दिले.

मागील आठवड्यामध्ये नंदकिशोर चौघुले यांनी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली. त्यांची एन्ट्री झाल्यानंतर त्यांनी वेगळाच पवित्रा आत्मसात केल्याचे दिसले आणि त्यांनी ते भूषणसमोर बोलून देखील दाखवले. भूषण, नंदकिशोर आणि त्यागराज यांनी मिळून आऊची कुशन टास्क मध्ये बरीच मस्करी केली, तसेच नंदकिशोरबरोबर पुष्कर, मेघा, सई आणि शर्मिष्ठा यांचा वाद बराच रंगला त्यावर महेश मांजरेकर यांनी नंदकिशोर बरोबरच इतर पुरुष मंडळीची शाळा घेतली. असे वागणे त्यांना शोभत नसून, त्यांना भूषण, आस्ताद, त्यागराज आणि नंदकिशोर यांचे वागणे अजिबात पटले नाही असे खडसावून सांगितले.

काल सुशांत शेलार यांनी सदस्यांची भेट घेतली आणि तो सुखरूप असल्याचे देखील सांगितले. महेश मांजरेकर यांनी आता सुशांत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पुन्हा येऊ शकणार नाही असे सदस्य तसेच प्रेक्षकांना सांगितले. आजच्या भागामध्ये कोण डेंजर झोन मध्ये जाणार ? कोण घराबाहेर जाणार ? हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी – WEEKEND चा डाव मध्ये रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

आज WEEKEND चा डाव मध्ये पुन्हा घरातील सदस्यांना मुकुट देण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणाला कुठल्या नावाचा मुकुट मिळतो ते बघणे रंजक असणार आहे. या मुकुटांवर सिनेमांची म्हणजेच गुलाम, ट्यूबलाईट अशी नावे असणार आहेत. आता बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य हे मुकुट कोणाला देणार आजच्या भागामध्ये कळेलच. तसेच यावरून आऊ आणि स्मितामध्ये बरीच वादावादी होणार आहे.

तेंव्हा हे सगळे बघा आज बिग बॉस मराठी – WEEKEND चा डाव मध्ये रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 56 Bigg Boss Marathi 02

Day 56 Bigg Boss Marathi 03

Day 56 Bigg Boss Marathi 04

Day 56 Bigg Boss Marathi 05

Day 56 Bigg Boss Marathi 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement