News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला बाहेर जाणे अनिवार्य होते. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे आलेल्या त्यागराज खाडिलकर यांना घराबाहेर जावे लागले आहे. या आठवड्यामध्ये भूषण, रेशम आणि त्यागराज हे डेंजर झोनमध्ये आले, आणि त्यागराज खाडिलकर यांना घराबाहेर जावं लागलं. बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडलेल्या सदस्याला महेश मांजरेकर घरातील सदस्यांबरोबर बोलण्याची संधी देतात ही संधी त्यागराज यांना देखील मिळाली. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये WEEKEND चा डाव मध्ये सदस्यांनी एकमेकांना वळू, गुलाम, ट्युबलाईट, खलनायक, हंटरवाली, चालबाज, बोलबच्चन अशी नावे असलेला मुकुट बहुमताने बहाल करायचा होता. ज्यामध्ये नंदकिशोर यांना खलनायक, बोल बच्चन भूषण, मेघाला चालबाज तर रेशमला हंटरवाली असे मुकुट देण्यात आले. तसेच प्रेक्षकांनी आपल्या मनातील प्रश्न सदस्यांना विचारले.

या आठवड्यामध्ये आरोपीच्या पिंजऱ्या मध्ये नव्हे तर एका वेगळ्या पद्धतीने महेश मांजरेकर यांनी नॉमिनेटेड सदस्यांना खुर्चीत बसवून प्रश्न विचारले. ज्यामध्ये महेश मांजरेकर यांनी नॉमिनेटेड सदस्यांशी निगडीत प्रश्न इतर सदस्यांना विचारले, जर उत्तर बहुमताने हो आलं तर प्रश्नाला खुर्चीत बसलेल्या सदस्याला एक थोबाडीत बसणार होती. मेघा, रेशम, त्यागराज, भूषण, आस्ताद आणि उषा नाडकर्णी हे त्या खुर्चीत बसले होते.

त्यागराज खाडिलकर या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडले. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Tyagraj Khadilkar Evicted Bigg Boss Marathi 02

Tyagraj Khadilkar Evicted Bigg Boss Marathi 03

Tyagraj Khadilkar Evicted Bigg Boss Marathi 04

Tyagraj Khadilkar Evicted Bigg Boss Marathi 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement