News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून काल त्यागराज खाडिलकर घराबाहेर पडले. भूषण, रेशम आणि त्यागराज डेंजर झोन मध्ये होते ज्यामध्ये त्यागराज यांना कमी मत मिळाले त्यामुळे ते घराबाहेर गेले. घरातून बाहेर गेल्यावर त्यागराज यांनी घरच्यांना काही गैरसमज असतील ते घरच्यांनी मनामध्ये ठेऊ नका असे देखील सांगितले. आता नवीन आठवडा सुरु झाला आहे बिग बॉस नक्कीच बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य, आणि बरेच नवे टास्क मिळणार आहेत. तेंव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ? कोण बनणार नवा कॅप्टन ? कोण कोणाला नॉमिनेट करणार ? हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडणार आहे असे बिग बॉस घोषित करणार आहेत. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले.

या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्याच्या चेहऱ्याला शाहीची पावडर फासणे अनिवार्य असणार आहे तेंव्हा कोण कोणाला नॉमिनेट करणार ? कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा हे सगळे हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 57 Bigg Boss Marathi 02

Day 57 Bigg Boss Marathi 03

Day 57 Bigg Boss Marathi 04

Day 57 Bigg Boss Marathi 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement