News
Typography

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालदेखील रंगले फ्रीझ – रीलीझ हे साप्ताहिक कार्य. या कार्या अंतर्गत बिग बॉस मराठीच्या घरामध्ये असलेल्या सदस्यांना म्हणजेच मेघा, पुष्कर, शर्मिष्ठा आणि भूषण यांना बिग बॉस तर्फे खूप सुंदर असे सरप्राईझ मिळाले. शर्मिष्ठाच्या बहिणीने शर्मिष्ठाला तर भूषणच्या बायकोने भुषणला मार्गदर्शन केले आणि त्यांची हिंमत देखील वाढवली. भूषणच्या बायकोने रेशमचे आभार मानले कि, ती मोठ्या बहिणीसारखी भूषणच्या मागे उभी आहे तसेच इतर सदस्यांना हे देखील सांगितले कि, भूषणला कटकारस्थान करता येत नसून आता सगळ्यांना त्याचा एक नवा खेळ लवकरच पाहिला मिळणार आहे. मेघाची आई आणि मुलगी मेघाला भेटण्यासाठी घरी गेल्या. मेघाच्या मुलीने मेघा आणि सईला एक निरोप देखील दिला. तेंव्हा बघायला विसरू नका आज फ्रीझ – रीलीझ टास्कमध्ये काय घडणार ? तसेच “हेल्थी स्माईल” या नव्या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार ? बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

बेबी फेलिशाला भेटून पुष्कर भावुक झाला. आस्तादला त्याचे वडील भेटायला येणार आहेत.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस सदस्यांसाठी डाबर रेड पेस्ट प्रस्तुत “हेल्थी स्माईल” स्पर्धेचे आयोजन करणार आहेत. या कार्या अंतर्गत सदस्यांची तीन टीम मध्ये विभागणी करण्यात येणार आहे. टीम A – दात, टीम B डाबर रेड पेस्ट आणि टीम C कॅव्हिटी असणार आहेत. टीम A ला म्हणेच दातांना टीम C मधील सदस्यांपासून म्हणजेच कॅव्हिटी पासून वाचविण्याची टीम B ची जबाबदारी असणार आहे. आता या टास्क मध्ये कोणती टीम विजयी होणार ?

हे बघायला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Day 60 Bigg Boss Marathi 02

Day 60 Bigg Boss Marathi 03

Day 60 Bigg Boss Marathi 04

Day 60 Bigg Boss Marathi 05

Day 60 Bigg Boss Marathi 06

Day 60 Bigg Boss Marathi 07

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement